शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

ज्यांनी जंगल जोपासलं; तेच बनले आता उपरे!

By admin | Published: September 13, 2015 12:12 AM

पाटणचा प्रश्न धगधगतोय : अभयारण्यालगतच्या गावांचा विचार गांभिर्याने व्हायला हवा

कऱ्हाड/पाटण : सध्या केअर झोन, बफर झोन, इको झोन असे शब्द लोकांच्या सतत कानावर पडत आहेत, वाचनात येत आहेत. अभयारण्यालगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना अटींचे पालन करतच जगावे लागत आहे. त्यामुळे ज्यांनी जंगल जोपासलं; तेच आता उपरे बनले आहेत, अशी भावना आता येथील रहिवाशांमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातील कोयना अभयारण्यालगत असणाऱ्या सुमारे ७२ गावांचा संबंध या ‘बफर झोन’शी तर १४ गावांचा संबंध या ‘कोअर झोन’शी येतो. ‘लोकमत टीम’ने यातील अनेक गावांत जाऊन तेथील लोकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही झोनविषयी विचारले असता, आम्ही हे ऐकून आहे; पण ते काय असतं ते माहिती नाही,’ असंच उत्तर मिळालं. खरंतर पुढारलेल्या देशांनी पर्यावरण बिघडवलं आहे. ते दुरुस्त करण्याचं काम पर्यावरणाचं महत्त्व जाणणाऱ्या भारतानं चालवलं आहे. जगभरामध्ये ३ टक्के जंगलक्षेत्र वाढवायचं आहे, म्हणून तर कोयना अभयारण्याकडे वनविभागाने चांगलेच लक्ष दिले आहे. पाटण, शिराळा, जावळी, महाबळेश्वर, सातारा अभयारण्यामधला वनविभागाच्या मालकीचा जो जंगलाचा भाग आहे, त्याचा ‘कोअर झोन’ मध्ये समावेश होतो. हा भाग वन्यप्राण्यांसाठी राखीव आहे. त्यावर वन्यजीव विभागाचं नियंत्रण आहे. वनखात्याच्या मालकीचा नसलेला; पण ‘कोअर झोन’ला लागून असणारा जो भाग आहे, त्याचा समावेश ‘बफर झोन’मध्ये करण्यात आला आहे. या नजीकच्या भागात अनेक गावे वर्षानुवर्षांपासून वसली असून, या झोनमुळे अनेक अटी येथील लोकांसमोर कायद्यानं मांडल्या आहे. त्या अटी लोकांना जाचक वाटत असल्याने ‘पर्यावरणवादी अन् मानव अधिकारवादी’ यांचे जणू युद्ध सुरू झाले आहे. खरंतर १९७२ चा फॉरेस्ट अ‍ॅक्ट चे कलम ३५ पाहिले तर त्यात या क्षेत्रात जमीन नांगरताना जरी फाळ लागून साप मेला तरी तो गुन्हा आहे, अशा विविध ‘बफर झोन’च्या अटी आहेत. १९८५ मध्ये कोयना अभयारण्यासंदर्भातील पहिले नोटिफिकेशन (पूर्वसूचना) निघाले. लोकांच्यात हा विषय हळूहळू पोहोचला. तेव्हा आम्ही जंगलं राखली, आम्ही प्राणी राखले म्हणून हे बक्षीस की शिक्षा? अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, १९९५ मध्ये येथे कोयना अन् चांदोली अभयारण्यांदरम्यान सह्याद्री व्याघ्रप्रकल्प सुरू झाला. त्यामुळे अगोदर कोअर निश्चित झाला, तर त्यानंतर ‘बफर झोन’ ही निश्चित होत आहे. ‘बफर झोन’ संदर्भातील पहिले नोटिफिकेशनही इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांना हे इंग्रजीतील समजणार का? याचा साधा विचारही कोणी केलेला दिसत नव्हता. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकरांसह काही आमदारांनी आवाज उठविल्यानंतर हे पूर्वसूचना देणारे नोटीस मराठीत प्रसिद्ध करण्यात आले. पाटण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या जाचक अटींबाबत हरकती घेतल्या आहेत. पण, त्याचं पुढे काय झालं, हे तिथल्या सरपंच अथवा ग्रामसेवकांनाही सांगता येत नाही. त्या लोकांचे पुनर्वसन करणार की, आणखी काय करणार, हे सरे प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच दिसतात. कोकण भाग कसा काय वगळला ? ‘बफर झोन’मध्ये सातारा, सांगली जिल्ह्यांतील काही भागांचा समावेश आहे. पण, यापेक्षा कोकण विभागातील भाग यासाठी सोयीचा आहे; पण तो का वगळण्यात आला? वनविभागाच्या लोकांना फिरणं सोयीचं व्हावं म्हणून का? अन्य काही कारण आहे. याबाबतची उलट-सुलट चर्चा लोकांच्यात सुरू आहे. (प्रतिनिधी)