शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

एकाच माटवीखाली तीन गणपती

By admin | Published: September 21, 2015 9:56 PM

काळसेतील केळुसकर कुटुंबिय : पिढ्यानपिढ्या जपताहेत परंपरा

अमोल गोसावी- चौके  --कोकणामध्ये गणेश चतुर्थी म्हटली की, धार्मिकता, परंपरा, श्रद्धा अतिशय उत्साहाने जपली जाते. सर्वसामान्यपणे प्रत्येक घरात एक गणपती मूर्ती असून त्यांची सेवा केली जाते. परंतु याला अपवाद आहे मालवण तालुक्यातील काळसे वरचावाडा येथील केळुसकर कुटुंबियांचे घर. या घरामध्ये एकाच घरात एकाच माटवीखाली, एकाच मंचावर तीन गणेशमूर्तींचे पूजन केले जाते.काळसे वरचावाडा येथील किशोर महादेव केळुसकर आणि कुटुंबिय यांचे मोठे घर आहे. एकुण अकरा कुटुंबे या घरात राहतात. या त्यांच्या घरामध्ये वर्षानुवर्षे तीन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करुन गणेश चतुर्थी साजरी करण्याची प्रथा आहे. अशा प्रकारे एकाच माटवीखाली तीन गणपती पूजन होणारे हे कोकणातील एकमेव कुटुंब असावे असा त्यांचा विश्वास आहे. परंपरेविषयी किशोर केळुसकर म्हणाले की, परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. ती प्रथा केव्हांपासून आणि का सुरु झाली हे आम्हालाही माहित नाही. आमची चौथी पिढी असून पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आम्ही जोपासतोय. हिंदुस्तान- पाकिस्तान एक असताना आमचे पूर्वज कराची येथे तंबाखूच्या व्यापाराच्या निमित्ताने स्थायीक झाले होते. त्यावेळीही ते चतुर्थीच्या निमित्ताने कळसे गावात यायचे. त्यानंतर कालांतराने भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर काही पूर्वज कराचीतून इकडे येऊन राहिले तर काहीजण फाळणीनंतर तिकडेच होते. पण १९६७-६८ च्या दरम्यान सर्वजण पूर्णपणे कराची सोडून इकडे आले. गावात स्थायीक झाले.सध्या आमच्या घरात अकरा कुटुंब असून २४ भाऊ आहेत. १३५ जणांचे केळुसकर कुटुंबीय असून ८४ वर्षांच्या श्रीमती गंगाबाई नारायण केळुसकर या घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्या आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्व केळुसकर कुटुंबिय गणेशोत्सवाला एकत्र येतात. गणेश गणशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यात होम करुन घरात शुद्धीकरण विधी करावा लागतो. आणि गणेश चतुर्थी दिवशी ती गणेश मूर्ती आणू त्यांची पूजा केली जाते. आणि गणेश चतुर्थी दिवशी पहिले भजन या गणपतीकडे केले जाते नंतरच वाडीतील इतर गणपतींचीही भजने केली जातात. तसेच गौरी विसर्जन झाल्यानंतरच या गणपतींचे विसर्जन केले जाते. या अगोदर विसर्जन करता येत नाही. त्यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे घरात कायम भरपूर माणसे असल्याने दरवाजांना त्यामुळे कुलुपही लावले जात नव्हते. अशा प्रकारे केळुसरक कुटुंबियांची आगळी चतुर्थी संपूर्ण जिल्हात प्रसिद्ध असून सर्व कुटुंबिय अतिशय श्रद्धेने आणि आनंदात ही परंपरा जोपास आहेत. समाजासमोर एकत्र कुटुंबपद्धीता चांगला आदर्श समाजासमोर ठेवत आहेत. गणपतींबरोबर तीन नागोबांचेही पूजनतीन गणपतींबरोबरच नागपंचमीला तीन नागोबाही पूजले जातात. असे असले तरी या घराची गुढी मात्र एकच असते हे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे वटपौर्णिमा, हरतालिका पूजनही ही संपूर्ण वाडीचचे याच घरात होते. आता केळुसकर कुटुंबातील सदस्य कामानिमित्त, व्यावसायानिमित्त बाहेर राहत असले तरी दोन पिढ्यांपूर्वी सर्वजण याच भव्य घरात राहायचे.