शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

Sindhudurg: आचरा समुद्रात होडी खडकावर आदळली, तिघांचा मृत्यू, नारळी पौर्णिमा दिवशीच घडली दुर्दैवी घटना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 19, 2024 12:40 PM

धुक्यामुळे अंदाज न आल्याने दुर्घटना 

आचरा (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील आचरा येथील समुद्रात नारळी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी मध्यरात्री सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात (छोटी होडी) नौका खडकावर आदळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाने पोहत येऊन किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले.मृतांमध्ये नौकामालक व सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम ऊर्फ जीजी आडकर (वय ६७), खलाशी प्रसाद भरत सुर्वे (३२), लक्ष्मण शिवाजी सुर्वे (६५) यांचा समावेश आहे. तर विजय अनंत धुरत (५३, रा. मोर्वे देवगड), असे बचावलेल्याचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, दुर्घटनेचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, हवालदार सुदेश तांबे, मिलिंद परब, मनोज पुजारे, विशाल वैजल आदींनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पाहणी केली.चौघांनीही टाकल्या समुद्रात उड्यासर्जेकोट येथील गंगाराम ऊर्फ जीजी आडकर हे रविवारी रात्री आपली जनता जनार्दन या नावाची मच्छीमारी पात नौका घेऊन तीन खलाशांना घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. कुणकेश्वर येथील समुद्रात मासेमारी करून जाळी ओढल्यावर ते माघारी परतत असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे नौका हेलकावे घेऊन पाणी भरू लागल्याने जीव वाचविण्यासाठी चौघांनीही समुद्रात उड्या घेतल्या. सोमवारी पहाटे यातील विजय धुरत हे आचरा बंदर नजीकच्या समुद्रातून पोहत येताना दिसून आले. तर अन्य तिघे मच्छीमार बेपत्ता होते.

विजय धुरतवर उपचार सुरूसोमवारी सकाळी हिर्लेवाडी व वायंगणी किनाऱ्यावर तिन्ही बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह आढळले. हे मृतदेह आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर पोहत आलेल्या विजय धुरत यांच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग