शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

चोरीप्रकरणातील तिघे संशयित ताब्यात

By admin | Published: April 20, 2016 10:45 PM

मुख्य आरोपी पसार : कणकवली पोलिसांची कारवाई

कणकवली : महिलेच्या डोळ्यात मसाला फेकून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्याची घटना ३ एप्रिल रोजी कणकवली शहरात घडली होती. या चोरीप्रकरणी पोलिसांनी ३ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. ३ एप्रिल रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास भालचंद्र महाराजांच्या आश्रमातील आरती झाल्यानंतर शहरातील विद्यामंदिर हायस्कूल जवळील गुरूकृपा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुहासीनी माणगांवकर आपल्या घरी परतत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची नात होती. गुरूकृपा अपार्टमेंटमध्ये जात असताना एका अज्ञात तरूणाने त्यांच्या डोळ्यात मसाला फेकला. तसेच त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे व एक तोळ्याचे असे ९७ हजार ५०० रूपये किंमतीची दोन मंगळसूत्रे लंपास करून मोटरसायकलवरून पोबारा केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस करत होते. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे पथकासह गस्त घालीत होते. यावेळी बसस्थानकाच्या परिसरात त्यांना प्रफुल्ल प्रकाश घाडीगावकर (वय २२ रा. विरार, मुंबई ) हा संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरीच्या उद्देशाने तो फिरत असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीअंती आपल्यासोबत आनखीन काही साथीदार असल्याचे त्याने सांगितले. बसस्थानकाच्या मागील बाजूच्या घरात दत्ताराम अंकुश जाधव (वय २०) हा राहत असून त्याच्या घरात चोरीप्रकरणातील मयुर लवू लाड (वय २३, रा. हळवल, परबवाडी) हा असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तत्काळ मयुर याला ताब्यात घेतले. तसेच चोरीप्रकरणातील आरोपी असल्याचे माहित असूनही मयुर याला आसरा दिल्याप्रकरणी दत्ताराम जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघा संशयीत आरोपींनी मंगळसूत्र चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी एक मंगळसूत्र हस्तगत केले असून दुसरे मंगळसूत्र हस्तगत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांना अटक करून गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (वार्ताहर)