शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

घरफोडीप्रकरणी तिघा युवकांना अटक

By admin | Published: March 30, 2015 12:07 AM

कणकवलीत कारवाई : अटकेतील सर्व उच्चशिक्षित

कणकवली : घरफोडी प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून शहरातीलच तिघा युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. अमित हेमंत वाळके (वय २२, तेलीआळी), अक्षय विनय बेळणेकर (२२) आणि अभिजित अनिल मांजरेकर (२१, बाजारपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. तिघांनाही २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अटक केलेले तीनही युवक उच्चशिक्षित आहेत. यामुळे शहरात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या आठ घरफोडीच्या सत्राचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री कणकवली पोलिसांनी ही कारवाई केली. यातील अमित वाळके आणि अक्षय बेळणेकर या दोघांना घरातून तर अभिजित मांजरेकर याला हॉटेल हॉर्नबिलनजीक ताब्यात घेण्यात आले. १९ जानेवारी रोजी कलमठ परिसरात ग्रामपंचायतीसह अकरा ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. यात २१ हजार रोख रकमेसह दागिने चोरीस गेले होते. (पान १० वर)या घरफोडीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांच्यासह हवालदार शेखर सावंत, उत्तम पवार, पोलीस नाईक पी. डी. पांढरे, सतीश अलदर, बुचडे, कॉन्स्टेबल सय्यद, करे आदींनी ही कारवाई केली. रविवारी पहाटे ४.५० वाजता ही कारवाई पूर्ण झाली. अटकेतील अमित वाळके आणि अभिजित मांजरेकर हे वर्गमित्र आहेत. वाळके हा बी.एस्सी. शिक्षण घेत होता. मांजरेकर हा एलएल.बी.च्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. तर बेळणेकर हा इंजिनिअरींग ड्रॉपआऊट आहे. शहरातील इतर घरफोड्यांमध्ये या युवकांच्या सहभागाची शक्यता, घरफोड्यांसंदर्भातील पुरावे आदीचा तपास सुरू असून, अधिक माहिती लवकरच उघड होईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चौकटआॅपरेशन कॅसिनोशहरात वारंवार होणाऱ्या घरफोड्यांनी त्रस्त पोलिसांनी यात सहभागी असणाऱ्यांना पकडण्यासाठी ‘आॅपरेशन कॅसिनो’ नावे मोहीमच राबवली. पकडण्यात आलेल्या युवकांनी आपल्याला टोपणनावे ठेवली होती. ‘रॉनी १’, ‘रॉनी २’ आणि ‘रॉनी ३’ अशी नावे गुप्त संभाषणासाठी धारण करण्यात आली होती. दोन महिने ‘वॉच’सातत्याने घडणाऱ्या घरफोड्यांमागे स्थानिकांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा दाट संशय होता. त्यादृष्टीने लक्ष केंद्रीत करण्यात आले. गोवा येथील कॅसिनोत जाणाऱ्या आणि दारूपार्ट्यांवर पैसे उधळणाऱ्या शहरातील युवकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. या दिशेने गेले तीन महिने ‘वॉच’ ठेवण्यात आला होता. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून युवकांना अटक केली.