कुडाळ : विज्ञान प्रदर्शनासारख्या उपक्रमातून आजचे विद्यार्थी चांगले नागरिक बनू शकतात. विद्यार्थ्यांनी कलागुणांचा योग्य वापर करून घ्यावा व शिक्षकांनीही प्रोत्साहन द्यावे. भरपूर अभ्यास करून यशाची कवाडे खुली करावीत आणि पालक व शाळेचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती स्रेहलता चोरगे यांनी केले. कुडाळ पंचायत समिती शिक्षक विभागातर्फे तुळसुली लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कुडाळ पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत पंचायत समितीचे सदस्य आनंद भोगले, परशुराम परब, गंगाराम सडवेलकर, गटशिक्षणाधिकारी भाकरे, विनाताई घोडगे, संजय बगळे, राजा कविटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विज्ञान प्रदर्शन व वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. यावेळी घेतलेल्या स्पर्धांचा प्रथम तीन क्रमांकानुसार गटवार निकाल असा - वक्तृत्व स्पर्धेत पाचवी ते आठवी गटात विश्वनाथ वालावलकर (कुडाळ हायस्कूल), यशवंत पारकर (पाट वरचावाडा), ऋषिकेश भडगावकर (पणदूर हायस्कूल). नववी ते बारावी गटात जागृती राणे (शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा), अपूर्वा देसाई (एस. एल. देसाई पाट), ऋतुजा मर्गज (कुडाळ हायस्कूल). निबंध स्पर्धेत पाचवी ते आठवी गटात सिमरन हरमलकर (न्यू इंग्लिश स्कूल, कसाल), आशिष गोसावी (कुडाळ हायस्कूल), सिद्धी तिवरेकर (शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा). नववी ते बारावी गटात सुचिता मांजरेकर (शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, साळगाव), तृप्ती पुजारे (न्यू इंग्लिश स्कू ल, कसाल), आकांंक्षा खोत (एस. एल. देसाई, पाट). प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून मनीष सुतार व कार्तिक खानोलकर (कुडाळ हायस्कूल), द्वितीय विभागून अक्षता काजरेकर व काशिबाई मर्गज (एन. व्ही. कुलकर्णी विद्यालय, पांग्रड), तृतीय क्रमांक विभागून निकिता खोचरे व धनश्री दळवी (वा. स. विद्यालय, माणगाव) यांनी मिळविला. या सर्व स्पर्धांमधील प्रथम क्रमांक विजेत्यांची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकानुसार यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : पाचवी ते आठवी प्राथमिकस्तरात मृण्मयी वालावलकर-अभिनव कुबडी (कुडाळ हायस्कूल), सृष्टी पालव-तुषार सिंचन (लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली), यश वालावलकर-हेल्प फॉर हॅण्डिकॅप (कुडाळ हायस्कूल). नववी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात सिद्धेश धुरी-सुपारी काढणी यंत्र (माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी), मयूरेश करंगुटकर-जलशुद्धिकरण संयंत्र (श्री वा. स. विद्यालय, माणगाव), गौरेश धुरी-टाकाऊ अन्नपदार्थापासून इंधन निर्मिती (लक्ष्मीनारायण विद्यालय, बिबवणे). तिन्ही विजेते जिल्हास्तरावर पात्र ठरले आहेत. प्राथमिक अध्यापक (पाचवी ते आठवी) शैक्षणिक साहित्य- सगुण केळुसकर - हसत खेळत गणित शैक्षणिक प्रतिकृती (जिल्हा परिषद शाळा डिगस नं. १), रणवीर राठोड-आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर (जिल्हा परिषद शाळा तेर्सेबांबर्डे गावडेवाडी), भालचंद्र आजगावकर-गणितातून लोकसंख्या शिक्षण (आवळेगाव पूर्व).माध्यमिक अध्यापक (नववी ते बारावी) शैक्षणिक साहित्य-रुपेश कर्पे- आश्चर्य प्रकाशाचे (शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूरतिठा), आत्माराम सावंत- गणिती प्रयोगशाळा (लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे). सत्यवान लाड- घनता काढणे (शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, साळगाव). विजेत्यांमधील प्रथम क्रमांक जिल्हास्तरावर पात्र ठरले आहेत.
अभ्यासातून यशाची कवाडे उघडावीत
By admin | Published: December 08, 2014 8:53 PM