ओरोस : सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीसह इतर भागात शुकवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी एकूण १२.९६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ६४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.शुक्रवारी पाचच्या सुमारास कणकवली तालुक्यातील फोंडा, नांदगाव, तळेरे भागात पावसाने मेघगर्जनेसह सुरुवात केली. (वार्ताहर)७२ तासांत अतिवृष्टीचा इशाराजिल्ह्यात येत्या ७२ तासांत अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दाखल होणार असून, या पथकामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी दिली.
कणकवलीला झोडपले; जिल्ह्यात मान्सूनची चाहूल
By admin | Published: June 06, 2015 12:08 AM