शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

तिलारी रामघाटात टेम्पो उलटून व्यावसायिक ठार

By admin | Published: December 25, 2016 11:35 PM

अन्य दोघेजण किरकोळ जखमी

दोडामार्ग : वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या तिलारी (रामघाट) घाटात बेळगाव ते दोडामार्ग अशी भाजी वाहतूक करणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोडामार्ग येथील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर (४५, मूळ रा. कुद्रेमणी, जि. बेळगाव) हा गाडीखाली चिरडून जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडला.गेल्या काही वर्षांत रस्त्याच्या डागडुजीकडे झालेले दुर्लक्ष आणि अवजड वाहतुकीचे वाढते प्रमाण आदीमुळे हा रामघाट वाहतुकीस धोकादायकच बनला आहे. असे असले तरी खडी वाहतूक करणारे डंपर, भाजी व्यावसायिक, ब्रॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारे टेम्पो याच घाटातून खाली कोकणात आणि पुढे गोव्यात जाणे पसंत करतात.रविवारी दोडामार्गचा आठवडा बाजार असल्याने दोडामार्ग बाजारपेठेतील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर हा भाड्याचा टेम्पो (एम एच ०४ - डीएस ३४८) घेऊन बेळगाव येथे गेला होता. शनिवारी मध्यरात्री ते दोडामार्गकडे येण्यास निघाले. यावेळी गाडीत चालक कल्लाप्पा रामकृष्ण पाऊसकर, वैजनाथ गोपाळ तलवार (रा. कुंद्रे्रमणी, बेळगाव) व दुर्गाप्रसाद वडर असे तिघेजण होते. पहाटे हा टेम्पो तिलारी घाटातील मोठ्या उतारावर आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे भीतीने क्लिनरच्या बाजूला असलेल्या दुर्गाप्रसादने जीव वाचविण्यासाठी बाहेर उडी मारली. याच दरम्यान टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो उलटला. टेम्पोच्या खाली दुर्गाप्रसाद चिरडला गेल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती चंदगड पोलिस ठाण्यात समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अधिक तपास चंदगड पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)रामघाट धोकादायक!दोडामार्ग आणि नजीकच्या गोवा राज्यात येणारी भाजी प्रामुख्याने बेळगाव (कर्नाटक) येथून आणली जाते. त्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता म्हणून तिलारी अर्थात रामघाटाचा उपयोग केला जातो. मात्र, नागमोडी वळणे आणि अतितीव्र उतार तसेच अवजड वाहतुकीमुळे झालेली रस्त्याची दुरवस्था आदी कारणांमुळे घाटातील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. असे असले तरी वाहनचालक जीवावर उदार होऊन वाहतूक करण्याचा धोका पत्करतात. मूळात या घाटाला उपप्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओची परवानगी नाही. त्यांच्या मते हा घाट वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने हा घाट आपल्याकडे हस्तांतरित केलेला नाही. परिणामत: सध्या या घाटाची मालकी पाटबंधारे विभागाकडेच आहे. तिलारी प्रकल्पाची यंत्रसामग्री आणण्यासाठी या घाटाची निर्मिती पाटबंधारे विभागाने केल्याने त्यांच्याच ताब्यात तो असून, अधूनमधून त्यांच्याकडूनच घाटाची दुरुस्ती होते.