शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आतापर्यंत बचत गटांना ६ कोटींचे कर्जवाटप

By admin | Published: December 27, 2015 10:10 PM

स्वयंरोजगारातून उत्पादन : सध्या ६ हजार ४९ बचत गट कार्यान्वित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह््यात एकूण ६ हजार ४९ बचत गट कार्यान्वित आहेत. महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय सुरू आहेत. व्यवसायासाठी जिल्ह््यातील एकूण ६५८ बचत गटांना ५ कोटी ९८ लाख ५२ हजारांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबातील महिला बचत गटांमार्फत स्वयंरोजगारातून विविध वस्तूंचे उत्पादन करण्यात येते. विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, इमिटीशन ज्वेलरी, शोभिवंत वस्तू, गोदडी, घरगुती कोकणी मसाले, घरगुती चवीचे कोकणी खाद्यपदार्थ, जेवण, नाश्ता, कोकणी मेवा, विविध फळांची सरबते, रस, सिरप, पापड, लोणची, विविध प्रकारची पिठे यांचे उत्पादन घेण्यात येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तसेच अन्य संस्थातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात बचत गट सहभागी होऊन आपल्या उत्पादनांची विक्री करतात. तसेच व्यक्तीगत स्तरावरही बचत गटांद्वारे विक्री करण्यात येते.बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या उत्पादनाबरोबरच आकर्षक पॅकेजिंग व चव याची प्रतवारीदेखील निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह््याबाहेर मुंबईत होणाऱ्या महोत्सवात, प्रदर्शनात बचत गट सहभागी होऊ लागले आहेत. उत्पादनाला होणारी वाढती मागणी यामुळे उत्पादन वाढीसाठी आवश्यक भांडवलाकरिता बचत गटांकडून कर्ज घेण्यात येते. बचत गटांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी २३६ बचत गटांना ३५ लाख १४ हजारांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर ६५८ बचत गटांना ५ कोटी ९८ लाख ५२ हजारांचे कर्ज वितरण बँकांतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)शासनाचा उपक्रम : बचत गटातून आर्थिक सक्षमतामहिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी, त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांची उन्नती होण्यासाठी शासनाने बचत गट ही संकल्पना राबविली. त्यानुसार ग्रामीण भागातही बचत गट स्थापन करण्यात आले. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी छोटे - मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यासाठी विविध बँकांनीदेखील त्यांना सहकार्य करण्यास सुरूवात केली आहे. या व्यवसायातून महिलांनी आपला विकास साधण्यास सुरूवात केली असून, अनेक बचत गट आर्थिक सक्षम झाले आहेत.तालुकाबचत गट संख्याचिपळूण५९९दापोली३७२गुहागर५१५खेड६२३मंडणगड२७९राजापूर७३३रत्नागिरी१०९८लांजा६५५संगमेश्वर११७५एकूण६०४९