शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

तिलारी प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा, बहुतांशी धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:11 PM

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७३.०७ टक्के भरला असून या प्रकल्पामध्ये सध्या ३२६.८८९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत ५१.६० मिलीमीटर पाऊस झाला असून १८५४.४० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून सततच्या पावसाने बहुतांशी धरणे ७० टक्के भरली आहेत.

ठळक मुद्देतिलारी प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा, बहुतांशी धरणे भरलीसिंधुदुर्गात पावसाची रिपरिप, उशिराने दाखल झालेल्या पावसाची जोरदार फटकेबाजी

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७३.०७ टक्के भरला असून या प्रकल्पामध्ये सध्या ३२६.८८९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत ५१.६० मिलीमीटर पाऊस झाला असून १८५४.४० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून सततच्या पावसाने बहुतांशी धरणे ७० टक्के भरली आहेत.कणकवली तालुक्यातील देवघर धरण ६०.५४ टक्के भरले असून सध्या या धरणातून १८.५८ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तर यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पामध्ये ३१.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ११ लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, पावशी, शिरवल, पुळास, हरकुळ, ओझरम आणि लोरे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. तर वेंगुर्ले तालुक्यातील आडेली लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये ९८.६८ टक्के, सावंतवाडी तालुक्यातील सनमटेंब प्रकल्पात ९५.८२ टक्के आणि वैभववाडी तालुक्यातील नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये ९२.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. हरकुळ प्रकल्पातून सध्या १४.०५ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.गेल्या चोवीस तासांत दोडामार्ग तालुक्यात ९५ मिलीमीटर पावसाची नोंदजिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ५१.५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. १ जून २०१९ पासून आजपर्यंत एकूण १४८०.२८ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. तालुका निहाय २४ तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत.सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.दोडामार्ग ९५ (१६८०), सावंतवाडी ६८ (१२७०), वेंगुर्ले २०.२ (१५५६.२४), कुडाळ ८० (१४९६), मालवण १८ (१२६०), कणकवली ८४ (१६८४), देवगड ११ (१२१३), वैभववाडी ३६ (१६८३) असा पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग