देवगड : विजयदुर्ग बंदराच्या विकासासाठी २०१९ साली १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून या बंदराच्या कामाला काही महिन्यांपासून सुरुवातही झाली आहे. मात्र, एका तक्रारदारामुळे या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीमुळे स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच काम बंद असल्याने या बंदर विकासाच्या कामासाठी जेटीवरती असलेल्या सुमारे दीडशे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.विजयदुर्ग बंदर हे कोकणातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदराचा विकास होण्यासाठी २०१९ मध्ये १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या बंदर विकासाच्या कामाला गेल्या काही महिन्यांपासून सुरुवातही करण्यात आली आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून या कामासाठी परवानगी न घेतल्याची तक्रार एका व्यक्तीने मत्स्य आयुक्त कार्यालयाकडे केली होती. यामुळे मत्स्य आयुक्तांनी विजयदुर्ग येथील बंदर जेटीच्या कामाला पुरातत्त्व विभागाकडून परवानगी न घेतल्याचे कारण दाखवित स्थगिती दिली आहे.या बंदराचे काम शापूजी पालोनजी अँड कंपनी प्रा. लिमिटेड ही ठेकेदार कंपनी करीत आहे. विजयदुर्ग बंदरात नव्याने मासळी उतरण्याच्या केंद्रावर मच्छिमारांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविणे हे काम पुरातत्त्व विभागाच्या अनुमतीशिवाय सुरू केल्याचे आदेशामध्ये म्हटले आहे. गडकिल्ल्यापासून ३०० मीटरपर्यंत कुठलेही बांधकाम करावयाचे असल्यास पुरातत्त्व विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. हीच परवानगी बांधकाम विभागाने घेतली नसल्याने तक्रारदाराचे म्हणणे ग्राह्य धरून मत्स्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे.तक्रारदाराची तक्रार निकाली काढून काम सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणीविजयदुर्ग किल्ला हा ऐतिहासिक किल्ला असून या किल्ल्याच्या परिसरातील बंदराच्या सुशोभिकरणाचे व तटबंदीचे काम काही महिन्यांपासून चालू झाले होते. हजारो पर्यटक विजयदुर्गमध्ये किल्ला पाहण्यासाठी येत असतात. मात्र, येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पर्यटकांनी तक्रारी केल्या आहेत.तर २०१९ साली विजयदुर्ग बंदराच्या विकासकामाला १० कोटी रुपये मंजूर झाले होते. या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली होती. या विकासामुळे विजयदुर्ग पर्यटनाला चालना मिळणार होती. मात्र, या कामाला स्थगिती मिळाल्यामुळे पर्यटनालाही खीळ बसू शकते.तक्रारदाराची तक्रार तत्काळ निकाली काढून विजयदुर्ग बंदर विकसित करण्याच्या कामातील त्रुटींची पूर्तता करून कामाला पुन्हा सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी विजयदुर्ग ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. उपासमारी होणाऱ्या कामगारांनाही काम मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
कामगारांवर उपासमारीची वेळ, विजयदुर्ग बंदराचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:30 PM
sindhudurg, Labour, fort, vijaydurg विजयदुर्ग बंदराच्या विकासासाठी २०१९ साली १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून या बंदराच्या कामाला काही महिन्यांपासून सुरुवातही झाली आहे. मात्र, एका तक्रारदारामुळे या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीमुळे स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच काम बंद असल्याने या बंदर विकासाच्या कामासाठी जेटीवरती असलेल्या सुमारे दीडशे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ठळक मुद्देकामगारांवर उपासमारीची वेळ, विजयदुर्ग बंदराचे काम ठप्प स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थांचे मोठे नुकसान