शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

सिंधुदुर्गात आज मराठ्यांची जिद्द दिसणार

By admin | Published: October 23, 2016 12:19 AM

एक मराठा लाख मराठाचा प्रत्यय येणार : ४ लाख मराठ बांधवांच्या उपस्थितीचा अंदाज

कणकवली : आजपर्यंत मराठा समाज पेटून उठला नव्हता. आता मात्र जिद्दीने एकवटला आहे. मराठ्यांची ही जिद्द रविवारी २३ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्गनगरीत दिसणार आहे. या मराठा क्रांती मूक मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ४ लाख लोक उपस्थित राहणार आहेत, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ओरोस फाटा येथे हे सर्व मराठा बांधव एकत्र येऊन ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मूक मोर्चाची सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजाला संघटित करू मराठ्यांची फौज तयार केली. शूर मावळ्यांना लढाईचे प्रशिक्षण देऊन मुस्लिम राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले. मुस्लिम जुलूमशाहीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही क्रांती रायगड किल्ल्यावर झाली.मराठा समाजाला शूरविरांची परंपरा आहे. हा मराठा समाज गेली ६0 वर्षे अन्याय सहन करीत आला आहे. पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मराठ्यांचा सहनशीलतेचा अंत आता संपलेला आहे. त्यामुळे आता मराठा समाज जिद्द हरणार नाही. ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी मुस्लिम राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातून हाकलून लावले व हिेंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे आता मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला व तिचा खून करण्यात आला त्या आरोपींना कडक शिक्षा करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी तातडीने अंमलात आणाव्या, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे व कायद्यात बदल करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे आदी २0 मागण्या करण्यात आल्या आहेत. ज्या ज्या वेळी मराठा समाजावर अन्याय झाला त्या त्या वेळी मराठ्यांचे कुलदैवत नेहमीच मराठ्यांच्या मदतीला धाऊन आले आहे. मुंबईत मराठा समाजावर ज्या वेळी अन्याय झाला त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठा समाजाला जागृत केले. मराठी तरुणांमध्ये लढण्याची ताकद निर्माण केली. तरुणांच्या चेहऱ्यावर तेज आले आणि सर्व तरुण फौज शिवसेनेत दाखल झाली आणि १९९५ साली विधानसभेवर भगवा फडकला. मराठांची ही परंपरा आहे. न्न्यायदेवता नेहमीच मराठ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. (वार्ताहर)