शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
2
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात; भाजपकडून लढण्यास इच्छुक
3
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
4
"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा
5
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?
6
सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
7
पृथ्वी शॉ,अजिंक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!
8
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 
9
4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान
10
म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल
11
इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा
12
टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा
13
कोरोना लसीमुळे दुष्परिणाम, दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, संतप्त सरन्यायाधीश म्हणाले...
14
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
15
अरेरे! १५ वर्षांच्या मुलीने दिलाय पोलिसांच्या डोक्याला ताप; १२ वर्षीय मुलासह तिसऱ्यांदा गेली पळून
16
China-Taiwan Conflict : चीननं तैवानला चारही बाजूंनी घेरलं; लष्करी सराव सुरू, २५ लढाऊ विमानांसह ७ युद्धनौकांनी दाखवली ताकद!
17
PAK vs ENG : पाकिस्तानची 'कसोटी'! इंग्लंडने उतरवला तगडा संघ; घरच्या मैदानात लाज राखण्याचे आव्हान
18
Diwali Muhurat Trading 2024: दिवाळीच्या दिवशी केव्हा होणार मुहूर्त ट्रेडिंग; तुम्हीही खरेदी करणार का?
19
BSNL : बीएसएनएलचा परवडणारा प्लान; रोज २ जीबी डेटा ; अनलिमिटेड कॉलिंग, दररोजचा केवळ ७ रुपयांचा खर्च
20
"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा

मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगावात टोल: शिवसेना आक्रमक, टोलनाक्यावरच मारला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 1:05 PM

प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कणकवली :  मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्यावर आज, १ जून पासून टोल वसुली करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी बुधवारी धडक देत आंदोलनाचा इशारा दिला. मात्र महामार्ग प्राधिकरणने ही मोहीम थांबविल्याने शिवसेनेने टोल वसुली विरोधात आपली भूमिका कायम असून टोल वसुलीला सुरुवात झाल्यास पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक होईल.तसेच  टोलवसुली हाणून पाडेल, असा इशारा यावेळी आमदार वैभव नाईक, कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, रुपेश पावसकर, ऍड. हर्षद गावडे तालुकाप्रमुख शैलेश भोगले, समीर परब, बाळू मेस्त्री, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशांत दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसैनिक बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून ओसरगाव टोलनाका येथे हजर झाले होते. यावेळी पुन्हा एकदा शिवसैनिक आणि आपला इरादा स्पष्ट करताना कोणत्याही स्थितीत टोल वसुली होऊ देणार नाही असा इशारा आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी दिला.टोलवसुलीबाबत संभ्रमओसरगावसोबत राजापूर- हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाShiv Senaशिवसेना