महेश सरनाईक-- सिंधुदुर्ग सिंधुुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे यांचे सुरूवातीला शिवसेना आणि त्यानंतर काँग्रेससोबत जोडले गेलेले अतूट नाते जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या विजयाने पुन्हा बहरून आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आलेली मरगळ भरून निघण्यासाठी हे नाते आगामी काळात महत्वाची भूमिका बजावणार आहे. सिंधुदुर्गात नारायण राणेंचीच जादू चालते हे पुन्हा एकदा येथील जनतेने सिद्ध केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विजय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उभारी देणारा ठरला आहे.जिल्हा परिषदेत काँग्रेसने २७ जागा जिंकून एकहाती सत्ता काबिज केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून निवडून आलेली दोडामार्गमधील जागा काँग्रेसच्या पाठींब्याने असल्यामुळे सदस्यसंख्या २८ होणार आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे हा विजय राणेंच्या राजकीय कारर्किदीसाठीदेखील महत्वाचा मानला जात आहे. तस पाहता राणेंचा सिंधुदुर्गमधील गड खालसा करण्यासाठी भाजपाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी भाजपाचे राज्यातील स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुडाळ येथे सभादेखील घेतली. मात्र, हे सर्व करूनही काँग्रेसकडून जिल्हा परिषदेतील सत्ता हस्तगत करणे सोडा दोन अंकी आकडा गाठणेही भाजपला शक्य झालेले नाही. उलटपक्षी शिवसेनेने सिंधुदुर्गात चांगले यश मिळविले आहे. शिवसेनेच्या जागा मागील निवडणुकीच्यामानाने चौपटीने वाढ झाली आहे. त्यासाठी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामानाने पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा करिष्मा त्यांच्या (पान कक वर)मालवण-कणकवलीत शतप्रतिशत काँग्रेसकाँग्रेसने कणकवली तालुक्यात सर्वच्या सर्व म्हणजे जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १६ जागा जिंकून जिल्ह्यात एक वेगळाच रेकॉर्ड केला आहे. कणकवलीत गत निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती केली आहे.मालवणातील सहा जागांपैकी पाच जागा जिंकून काँग्रेसच वरचड ठरली आहे. याठिकाणी शिवसेनेने अतिशय प्रतिष्ठेची लढाई केली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी एकहाती किल्ला लढवित काँग्रेसला यश मिळवून दिले.
काँग्रेसला उभारीसाठी निसटत्या विजयाचे ‘टॉनिक’
By admin | Published: February 23, 2017 11:49 PM