सिंधुदुर्ग : १ जानेवारी २०१९ या आर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादि ३१ आॅगस्ट रोजी जाहिर झाली असून या यादिनुसार जिल्ह्यातील मतदारांमधे तब्बल ९ हजार ८६६ एवढी मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात नेहमी प्रमाणे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारां पेक्षा जास्त राहिली असून, अंतिम ६ लाख ६९ हजार ६२३ एवढी मतदार संख्या निश्चित झाली आहे. यात ३ लाख ३३ हजार २८४ पुरुष आणि ३ लाख ३६ हजार ३३९ महिलांचा समावेश आहे.२०१९ मधे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने १ जानेवारी २०१९ या आर्हता दिनावर अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. या मतदार यादीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६ लाख ६९ हजार ६२३ एवढे मतदार असून लोकसभा निवडणुकी पूर्वी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादी तील मतदार संख्येपेक्षा या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जाहिर करण्यात आलवल्या अंतिम मतदार यादी मध्ये तब्बल ९ हजार ८६६ येवढ्या अधिक मतदारांची नोंद झाली आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ५९ हजार ७५७ एवढे मतदार होते. दरम्यान अंतिम मतदार यादि जाहिर झाली असली तरीही मतदार नोंदणीचा निरंतर कार्यक्रम सुरु असून अजुन पुरवणी यादिही होण्याची छक्यता आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीसाठी उमेद्द्वारी अर्ज दाखल होईपर्यंत मतदार यादीत नाव नोंद करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.विधानसभानिहाय मतदारांची संख्याविधान सभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी तेवढी मतदान यंत्र प्राप्त आहेत. यात २०७१ बॅलेट यूनिट, १०७७ कंट्रोल यूनिट आणि ११२८ व्हीव्हीप्याड मशीन उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपर्यंत ९१५ एवढी मतदान केंद्र होती यात एकने भर पडली असुन आता जिल्ह्यात ९१६ मतदान केंद्रे झाली आहेत. कणकवली विधानसभा मतदार संघ २ लाख २९ हजार ७५६ मतदार, कुडाळ २ लाख १५ हजार ४९५ आणि सावंतवाडी २ लाख २४ हजार ३७२ मतदार आहेत विधान सभा निवडणुकीसाठी ४ हजार ५८४ येवढे निवडणूक अधिकारी व कर्मचारी घेण्यात येणार आहेत
जिल्ह्यात तब्बल ९ हजार ८६६ मतदारांची वाढ, यादी ३१ आॅगस्ट रोजी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:39 PM
१ जानेवारी २०१९ या आर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादि ३१ आॅगस्ट रोजी जाहिर झाली असून या यादिनुसार जिल्ह्यातील मतदारांमधे तब्बल ९ हजार ८६६ एवढी मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात नेहमी प्रमाणे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारां पेक्षा जास्त राहिली असून, अंतिम ६ लाख ६९ हजार ६२३ एवढी मतदार संख्या निश्चित झाली आहे. यात ३ लाख ३३ हजार २८४ पुरुष आणि ३ लाख ३६ हजार ३३९ महिलांचा समावेश आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात तब्बल ९ हजार ८६६ मतदारांची वाढ, यादी ३१ आॅगस्ट रोजी जाहीरमहिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा जास्त