शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

रत्नागिरीतील मत्स्यालय बनतंय प्रेक्षणीय स्थळ

By admin | Published: August 07, 2015 10:31 PM

पर्यटकांना पर्वणी : सात महिन्यात एक लाख पर्यटकांची भेट

रत्नागिरी : विविध शोभिवंत मासे, सागरीजीव यांच्या आकर्षक मांडणीमुळे मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे मत्स्यालय नव्या स्वरुपात सुरू झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश येथील पर्यटकांचा ओघ याठिकाणी वाढला आहे. गेल्या सात महिन्यात या मत्स्यालयाला एक लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. रत्नागिरीचा भाट्ये आणि मांडवीचा सागरी किनारा, समुद्राच्या लाटा झेलत ताठपणाने उभा असलेला रत्नदुर्ग, जाज्ज्वल्य देशभक्त लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पदस्पर्श लाभलेले पतितपावन मंदिर, इंग्रज काळातील बंदिवान राजाची स्मृती जागवणारा थिबा पॅलेस ही रत्नागिरीची ओळख आहे. पण यात आता मत्स्यालय या नाविन्यपूर्ण ठिकाणाची भर पडली आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे मत्स्यालय आणि संग्रहालय आता गोड्या पाण्यातील व सागरी जीवनाची सफर घडविणारे हे ठिकाण ‘फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन’ ठरत आहे.सागरी जीवसृष्टीची ओळख करून देणारे हे संग्रहालय यापूर्वीदेखील कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव त्याच शहरातील झाडगाव येथील नयनरम्य परिसरात स्थलांतर करण्यात आले आहे. यात गोड्या व खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मासे व पाणवनस्पती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गेल्या ५० वर्षांपासून जोपासलेली दोन जातीची समुद्री कासवेही मत्स्यालयाचे आकर्षण ठरत आहेत. तसेच ३५० वेगवेगळ्या जातीचे शास्त्रीय पद्धतीने रसायनामध्ये संग्रहीत मासे विद्यार्थी, संशोधकांसह पर्यटकांना सागरी जीवांची अधिक व्यापक पद्धतीने ओळख करुन देतात. संग्रहालयातील ५५ फूट लांब व ५ टन वजनाचा देवमाशाचा सांगाडा सागरी जीवांच्या भव्यतेची कल्पना पर्यटकांना करुन देतो. सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यजीवनाची शास्त्रीय पद्धतीने ओळख करुन देणारे मत्स्यालय आणि संग्रहालय हे विद्यार्थी, संशोधक, शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. मत्स्यालय आणि संग्रहालय नव्या स्वरुपात ११ डिसेंबर २०१४ पासून कार्यरत झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या पर्यटकांची संख्या गेल्या सात महिन्यात १ लाखापेक्षा अधिक आहे. निसर्गरम्य सागर किनारा लाभलेल्या रत्नागिरी शहरात सागरातील जीवसृष्टीची माहिती देणारे हे केंद्र स्थलांतरानंतर अधिक प्रेक्षणीय आणि ज्ञानवर्धक ठरले आहे. सागरी जीवसृष्टीची ओळख करून देणारे असल्याने त्याकडे पर्यटनविषयक अभ्यासकेंद्र म्हणून पाहिले जाते. रत्नागिरीतील या ठिकाणाला सात महिन्यात सुमारे १ लाख पर्यटकांनी भेट दिली. (प्रतिनिधी)पर्यटकांना याठिकाणी सागरी जीवनाबाबत शास्त्रीय माहिती सहज-सोप्या पद्धतीने सांगितली जाते. विविध शोभिवंत मासे, सागरी जीव यांच्या आकर्षक मांडणीमुळे मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढतच राहणार असून, त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.- डॉ. हुकुमसिंह ढाकर,केंद्र्रप्रमुख तथा वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीगोडे पाणी विभागात २८ टाक्यांमध्ये अरोवाना, डिस्कस, कॅट फिश, टेट्रा, प्लॉवर, सिल्व्हर शार्क आणि खारे पाणी विभागात २६ टाक्यांमध्ये मोनोअँजेल, केंड, बटरफ्लाय, लायन, निमो, गोबरा अशा विविध जातीचे मासे पाहायला मिळतात.