शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

पर्यटकांची पावले ओटवणे दशक्रोशीकड

By admin | Published: March 11, 2015 10:32 PM

ग्रामस्थांच्या एकीचे फळ : महोत्सवामुळे झालेल्या प्रसिद्धीचा परिणामे

महेश चव्हाण-ओटवणे दशक्रोशी समिती आणि डी. के. टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाचा सकारात्मक परिणाम दशक्रोशी स्थळाच्या पर्यटन तथा व्यवसाय वृद्धीवर दिसून येत आहे. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून या स्थळांची प्रसिद्धी परराज्यात तथा मोठ्या शहरांपर्यंत पोहोचल्याने तेथील पर्यटकांची पावले ओटवणे दशक्रोशीत वळू लागली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेली ओटवणे दशक्रोशीतील निसर्गरम्य गावे, पांडवकालीन पदस्पर्शाने आणि सावंतवाडी राजकीय संस्थानाचा वारसा लाभलेली ही गावे तेरेखोल नदीने न्हाऊन निघाली आहेत. दाभिल नदी आणि तेरेखोल नदीच्या बारमाही वाहणाऱ्या बहावाने गाव हिरवळीने नटले आहे. अशा निसर्गरम्य भागातील प्रेक्षणीय स्थळे म्हणजे एक अनमोल ठेवाच!नेत्रांचे पारणे फेडणारे आणि विलक्षणीय अशी पर्यटनस्थळे असूनही ती प्रसिद्धीपासून दूर होती. मात्र, ओटवणे दशक्रोशी समिती व डी. के. टुरिझम यांच्या संयुक्त माध्यमातून पर्यटन महोत्सव राबवून पर्यटकांचे लक्ष वेधण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्यात आला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून दोनशे पर्यटक ओटवणे दशक्रोशीत आणण्यात आले. या पर्यटकांनी येथील अभूतपूर्व स्थळे तर पाहिलीच, त्याशिवाय स्थानिक घरगुती खाद्यान्नाचासुद्धा लाभ घेतला. त्यामुळे नकळत येथील स्थानिकांना आर्थिकतेचे साधन निर्माण झाले आहे. गोवा राज्यातील तथा मुंबई, कोल्हापूर, पुणे तसेच कर्नाटक सीमेनजीक शहरातील बरेच पर्यटक या पर्यटन स्थळांकडे आकर्षित होत आहेत. यंदाच्या ओटवणे दशक्रोशी समितीच्यावतीने राबविलेल्या पर्यटन महोत्सवाचे यश पाहून आगामी काळात याहूनही सरस आणि विविध कार्यक्रमांनी भरलेला आणि पर्यटन वृद्धीला अधिक लाभदायक ठरणारा पर्यटन महोत्सव राबविण्याचा ठराव दशक्रोशी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष एम. डी. सावंत, डी. के. टुरिझमचे डी. के. सावंत, प्रभाकर गावकर, शिवराम सावंत, राजाराम दळवी, सौरभ सिद्धे, कृष्णा सावंत, सोनू दळवी, रवींद्र म्हापसेकर, रवींद्र कुडाळकर, बाबली सावंत, समीर परब, प्रकाश दळवी, गजानन सावंत, विलास सावंत, रामदास पारकर, विजय गावडे, आदी दशक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.विकासाचा प्रयत्नया पर्यटन महोत्सवांच्या माध्यमातून दशक्रोशी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा या दशक्रोशी समितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकासाच्या दृष्टीने दुणावला असून, त्यामुळे केवळ पर्यटन स्थळांचा नव्हे, तर दशक्रोशीतील समाविष्ट सर्व गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दशक्रोशी विकास समिती प्रयत्नशील राहणार आहे. -डी. के. सावंतओटवणे, पर्यटन व्यावसायिकस्टॉलधारकांना हजारोंचे उत्पन्नपर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून बचतगटांनी उभारलेले स्टॉल्स्, स्थानिक ग्रामस्थांची दुकाने, हॉटेल्स् यांना हजारो रुपयांचा नफा झाला. बचतगटांनी ठेवलेल्या गृहोपयोगी वस्तू, खाद्यान्नांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. काही गावांमध्ये अथवा शहरांमध्ये आयोजित केलेले पर्यटन महोत्सव त्या गावापुरते अथवा शहरापुरतेच मर्यादित असतात; परंतु ओटवणे दशक्र ोशीतील सर्व दहा गावांनी ‘न भूतो न भविष्यती’ असा पर्यटन महोत्सव यशस्वीरीत्या आयोजित करून दाखविला. यातून ओटवणे दशक्रोशीतील लोकांची एकी दिसून आलीच, त्याशिवाय जिल्ह्यातील इतर गावांपुढेही मोठा आदर्श ठेवला आहे.