सिंधुदुर्ग : ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह किल्ला रहिवाशाला बेळगांव येथील पर्यटकांनी कर वादा देण्यातून मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शाब्दिक बाचाबाचीतून घडलेला हा प्रकार असून पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पर्यटकांच्या माफीनाम्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला.दरम्यान, त्या पर्यटकांच्या ग्रुपने सुरुवातीला सरपंच घनश्याम ढोके व ग्रामस्थांशी बाचाबाची केली. त्यावेळी सरपंचांनी पोलिसांना बंदरजेटी येथे पाचारण केल्यानंतर पर्यटकांची दादागिरी मावळली.वायरी ग्रामपंचायतीच्यावतीने ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटन कर गतवर्षीपासून वसूल केला जातो. किल्ल्यावर प्रवेश केलेल्या बेळगांव येथील १८ पर्यटकांच्या ग्रुपकडे पर्यटन कर देण्याची मागणी केली.यावेळी त्या पर्यटकांनी वसुली कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तणूक सुरू केली. कर्मचाऱ्यांच्या शर्टाच्या कॉलरला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची दादागिरी, रहिवाशाला बेळगांव येथील पर्यटकां मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 3:50 PM
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां सह किल्ला रहिवाशाला बेळगांव येथील पर्यटकांनी कर वादा देण्यातून मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शाब्दिक बाचाबाचीतून घडलेला हा प्रकार असून पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पर्यटकांच्या माफीनाम्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला.
ठळक मुद्देऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची दादागिरीरहिवाशाला बेळगांव येथील पर्यटकांची मारहाणपर्यटकांच्या माफीनाम्यानंतर वादावर पडदा