मालवण : तालुक्यातील धामापूर तलावातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार ४ मे रोजी जलतज्ज्ञांच्या पथकाने धामापूर तसेच कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलावाची पाहणी केली.यावेळी जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडले, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे श्रीधर पेडणेकर, बिर्ला कॉलेज कल्याणचे प्रा. कपिल अष्टेकर, महंमद शेख, प्रा. निखिल गवई, ओंकार केणी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मुख्याधिकारी रंजना गगे, आवेक्षक सुधाकर पाटकर, दीपक पाटकर, पंकज सादये, आप्पा लुडबे, जलशोषक महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.यावेळी मुंडले म्हणाले, धामापूर शिवकालीन तलाव आहे. गेली कित्येक वर्षे या तलावातील गाळ काढला गेल्याची प्रशासकीय नोंद नाही. तलाव ७० ते ८० फूट खोल असल्याने गाळ काढणे आवश्यक आहे. जिथे पाण्याचे साठे उपलब्ध आहेत व जिथे पाण्याची गळती आहे तेथे डागडुजी करणे आवश्यक आहे. गाळ काढल्यास पाण्याचा साठा वाढू शकतो.डोंगुर्ला तलावाच्या पाहणीप्रसंगी मुंडले यांनी एप्रिल, मे कालावधीत देखील डोंगुर्ला तलावात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. या तलावाची डागडुजी केल्यास कुंभारमाठ परिसरातील ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि धामापूर तलावातील पाण्यावरील भार कमी होईल. कासारटाका येथे बंधारा झाल्यास पाणी उपलब्ध होईल.
डोंगुर्ला तलावाची तज्ज्ञांकडून पाहणी, धामापूर तलावालाही दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 4:47 PM
मालवण तालुक्यातील धामापूर तलावातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार ४ मे रोजी जलतज्ज्ञांच्या पथकाने धामापूर तसेच कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलावाची पाहणी केली.
ठळक मुद्देडोंगुर्ला तलावाची तज्ज्ञांकडून पाहणी धामापूर तलावालाही दिली भेट