शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

दिवाळीपूर्वीच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल!, अनेक मार्गांवर आतापासूनच वेटिंग

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 26, 2023 3:51 PM

सर्वाधिक गर्दी मुंबई मार्गावर

सिंधुदुर्ग : दिवाळीसाठी मुंबईत तसेच सुटीत पर्यटनस्थळी जाण्यासाठी महिना अगोदर रेल्वेचे आरक्षण करण्यास प्रवासी सुरूवात करतात. तर ऐनवेळी प्रवास करण्यास निघणाऱ्या प्रवाशांना तत्काळची सेवा घ्यावी लागते. त्याचबरोबर ती मिळाली नाही तर इतर पर्यायी सेवेचा वापर करून प्रवास करावा लागतो. दिवाळीचेही तिकीट बुकिंग आतापासूनच सुरू असल्याने बहुतांश गाड्या फुल्ल झाल्या आहेत.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी आदी गाड्यांचे बुकिंग फुल्ल दाखवित आहे. तर मंगला एक्सप्रेस, मंगलोर एक्सप्रेस, कोचिवली, मंगलादीप तिरूनवेल्ली एक्सप्रेस या गाड्यांचेही तिकीट मिळणे मुश्किल झाले आहे.एजंटांची चांदी

  • तिकिट मिळणे अवघड आहे. यामुळे प्रवास करण्यासाठी कुठल्याही स्थितीत आपल्याला तिकीट मिळावे म्हणून प्रवासी एजंटाकडे धाव घेतात.
  • प्रवाशांची अडचण लक्षात घेता एजंटांनी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत.

सर्वाधिक गर्दी मुंबई मार्गावरदिवाळी तसेच सुटीच्या दिवसात मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण लवकरच फुल्ल होतात. कारण दिवाळी सण साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्हावासीय मुंबईकडे धाव घेताना आढळतात. उन्हाळी सुट्टी आणि गणेशोत्सवात चाकरमानी गावाकडे धाव घेतात. तर दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी गावकरी महानगरीला सर्वाधिक पसंती दर्शवितात.

दिवाळीचा प्रवास केवळ तत्काळ, प्रीमियम तत्काळवर

  • दिवाळी सणानिमित्त सुमारे एक महिन्यापासूनच मुंबई, गुजरात, मेंगलोर, दिल्ली कडे जाणाऱ्या गाड्यांमधील आरक्षण करण्यात येते. त्यामुळे रेल्वे गाड्या लवकरच फुल्ल होतात.
  • तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना दिवाळीचा प्रवास तत्काळ आणि प्रीमियम तत्काळवरच करावा लागणार आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेDiwaliदिवाळी 2022