शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

जमीन देकार पत्र कंपनी उपाध्यक्षांकडे सुपूर्द

By admin | Published: January 05, 2017 11:47 PM

कोका कोलाचा चौथा प्रकल्प : एक हजार कोटीची गुंतवणूक

रत्नागिरी : हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस कंपनी कोकणातील अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये गुंतवून नवीन प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पासाठीचे जमीन देकार पत्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कंपनीचे उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स) उमेश मलिक यांच्याकडे सुपूर्द केले आहे. या ठिकाणी ही कंपनी ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेये यांचे उत्पादन करणार आहे. कोका कोला कंपनीचा राज्यातील हा चौथा प्रकल्प असणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये या कंपनीस शंभर एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. या ठिकाणी कोका कोला कंपनी ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेये यांचे उत्पादन करणार आहे.यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, उपकार्यकारी अधिकारी अविनाश ढाकणे, रत्नागिरीचे विभागीय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे, आदी उपस्थित होते. हिंंदुस्थान कोका कोलाच्या या प्रकल्पामुळे कोकणातही औद्योगिक संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग विभागाच्या औद्योगिक विकेंद्रीकरणाच्या धोरणामुळे कोकणात उद्योग येत आहेत. मेक इन इंडियाअंतर्गत महाराष्ट्रात हिंंदुस्थान कोका कोला कंपनीने हा प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. सुमारे एक हजार कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक येथे करण्यात येणार असून, हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असणार आहे, अशी माहिती मलिक यांनी याप्रसंगी दिली. (प्रतिनिधी)कोकणातील सहाशे युवकांना रोजगारहा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी उद्योग विभागामार्फत प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पामुळे कोकणातील सुमारे ५०० ते ६०० युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.हिंंदुस्थान कोका कोला कंपनी कोकणात उभारणार प्रकल्पकोकणातील ५०० युवकांना मिळणार रोजगारराज्यातील चौथा प्रकल्पलोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत एक हजार कोटींची गुंतवणूक