सावंतवाडी : सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची काल, बुधवारी रात्री उशिरा तडकाफडकी बदली करण्यात आली. या बदलीचे कारण समजू शकले नाही. मेंगडे यांच्याकडे सिंधुदुर्ग सायबर सेलचा कार्यभार देण्यात आला आहे. तर तात्पुरता कार्यभार हा दोडामार्ग पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.फुलचंद मेंगडे यांना सावंतवाडी पोलिस निरीक्षक पदाचा कार्यभार एक वर्षापूवी देण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्याजागी मेंगडे यांना नेमणूक देण्यात आली होती. गेल्या वर्षभरात शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच अवैद्य धंद्याचे वाढते प्रमाण रोखण्यात मेंगडे यांना बऱ्यापैकी यश आले होते.मात्र बुधवारी रात्री त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मेंगडे यांच्या बदलीमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून बदली मागचे कारण काय याची चर्चा सुरु होती.पुन्हा एकदा संगीत खुर्चीतत्कालीन पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या काळात सर्वच पोलिस ठाण्यात संगीत खुर्चीचा खेळ सुरू होता. दर आठवड्याला तसेच महिन्याला अधिकारी बदलला जात असे तसाच काहीसा प्रकार हा नव्या अधीक्षकांच्या काळात होतो की काय याचीच चर्चा सिंधुदुर्ग पोलिस दलात सुरू आहे.
सावंतवाडी पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली, कारण अस्पष्ट
By अनंत खं.जाधव | Published: June 15, 2023 6:08 PM