सावर्डे : प्राथमिक शाळेतील मुलांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आपली स्पर्धा जगाशी असून, विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे मत सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र हजारे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव अशोक विचारे, सरपंच सानिका चव्हाण, उपसरपंच अजित कोकाटे, सदस्य सुभाष मोहिरे, विजय भुवड, शौकत माखजनकर, मुकुंद तारे, नायब तहसीलदार मनोज मुसळे, आयटीआयचे प्राचार्य उमेश लकेश्री, स्पर्धा संयोजक शकील मोडक, सूर्यकांत चव्हाण, संजय चव्हाण, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शेखर निकम पुढे म्हणाले की, ‘शैक्षणिक धोरणामुळे मुलांचा दर्जा कसा सुधारणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी तुकडीनुसार शिक्षकांची नियुक्ती होत होती. यावर्षीच्या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे : निबंध स्पर्धा - प्रथम स्नेहा मुसळे (विश्वनाथ विद्यालय, इयत्ता तिसरी, राजापूर नं. १), द्वितीय ऋची राजेश घाग (आगशे प्राथमिक विद्यालय, रत्नागिरी), तृतीय क्रमांक पूर्वा शंकर जाधव (पटवर्धन प्राथमिक विद्यालय, रत्नागिरी), तर उत्तेजनार्थ गौरी शंकर शिंदे (शाळा, खेर्डी), प्रणव गडदे (सावर्डे), तनिष्का पाटील (प्राथमिक शाळा, विलवडे, लांजा) यांना गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक वेद ुपुरोहित (शाळा देवरुख, क्र. ३), द्वितीय क्रमांक ईशा शशांक टिकेकर (जिल्हा परिषद शाळा क्र. ४, देवरुख), वेदिका प्रवीण लिंगायत (खेर्डी), तृतीय क्रमांक ऋतुजा भरत लाड (जिल्हा परिषद शाळा, ढाकमोली) व सानिका प्रशांत चव्हाण (जिल्हा परिषद शाळा, सावडी), उत्तेजनार्थ स्वरा महेश केळकर, रोजिना मुसा साबळे, योगिता मिलिंद सहस्त्रबुध्दे यांना गौरविण्यात आले. समूहगीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी (चिंचघर), द्वितीय क्रमांक कृं. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी, तृतीय क्रमांक सह्याद्री शिक्षण संस्थेची सावर्डे प्राथमिक शाळा, सावर्डे, उत्तेजनार्थ जिल्हा परिषद शाळा, पडवे, गवाणवाडी (ता. मंडणगड) व जिल्हा परिषद शाळा क्र. ३ देवरुख यांना गौरविण्यात आले. (वार्ताहर)
मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न हवेत : निकम
By admin | Published: January 22, 2015 11:27 PM