शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

नोकरीचे पैसे टिव्हीतून वसूल करण्याचा प्रयत्न

By admin | Published: April 16, 2015 10:17 PM

सावंतवाडीतील घटना : ग्रंथपालच्या नोकरीसाठी सव्वा लाख दिले

कुडाळ : गं्रथपालाची नोकरी लावतो म्हणून सांगत मुन्नीश्वर हजारे (रा. गारगोटी कोल्हापूर) नामक युवकाकडून १ लाख २० हजार रूपये सावंतवाडीतील दिनानाथ नाईक यांनी घेतले होते. पण नोकरी न लावल्याने यातील काही रक्कम हजारे यांना नाईक यांनी परत दिली. मात्र, तगादा लावूनही उर्वरित रक्कम न दिल्याने दिनानाथ नाईक यांच्या घरातील टिव्ही उचलून नेण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांना बोलावून घेतले. यावर तोडगा काढण्यात आला. या दोघांचेही जबाब नोंदवले आहेत.येथील एका संस्थेत दिनानाथ नाईक कार्यरत होते. मुन्नीश्वर हजारे हे गं्रथपालचे शिक्षण घेण्यासाठी सावंतवाडीत येत असत. त्यावेळी नाईक यांनी हजारे यांना मी तुम्हाला नोकरी लावतो, या संस्थेत ग्रंथपाल पद रिक्त आहे, असे सांगितले होते. त्यामुळे २०११ मध्ये हजारे यांनी नाईक यांच्या मागणीनुसार नोकरी लावण्यासाठी १ लाख २० हजार रूपये दिले होते. मात्र, गेल्या तीन चार वर्षात हजारे यांना नोकरीच लावण्यात आली नाही.त्यामुळे संतापलेल्या हजारे यांनी तुम्ही नोकरी लावत नसाल तर मी दिलेली रक्कम परत द्या, असा सतत तगादा लावला त्यामुळे नाईक यांनी वेळोवेळी यातील काही रक्कमही हजारे यांना दिली. मात्र, सर्व रक्कम दिली नाही. मुन्नीश्वर हजारे हे सतत गारगोटी येथून सावंतवाडीत येत पैशांची मागणी करीत असत पण नाईक यांनी हे पैसे दिले नाही त्यामुळे चार दिवसांपूर्वी हजारे हे कुटुंबासहित सावंतवाडीत येत दिनानाथ नाईक हे राहत असलेल्या घरात जाऊन घरातील टिव्हीसह अन्य वस्तू उचलून घेऊन गेले. यावेळी नाईक हे मुंबईला गेले होते. शुक्रवारी नाईक हे सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुन्नीश्वर हजारे यांना बोलावून घेतले. ते आज सायंकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर घडलेली हकीगत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना सांगितली. शेलार यांनी दोघांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर नाईक यांनी आपण हजारे यांना बहुतांशी रक्कम अदा केली असून काही रक्कम शिल्लक आहे. ती लवकरच देणार असल्याचे कबूल केले. तसेच घरातून परस्पर साहित्य उचलून नेल्याबद्दल हजारे यांना समज देत दोघांचेही जबाब नोंदवले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. (प्रतिनिधी)