शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

शेर्पे येथे तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

By admin | Published: January 16, 2016 11:33 PM

हायस्कूल, स्टेशनरी दुकानातही चोरी : काळेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडली

खारेपाटण : तालुक्यातील शेर्पे या गावी शुक्रवारी मध्यरात्री अज्ञाताने तीन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. शेर्पे माध्यमिक विद्यालयाचे कार्यालय, हेमंत पवार यांचे स्टेशनरी दुकान तसेच काळेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, शेर्पे येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शेर्पे माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील तीन कपाटे खोलून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पसरून टाकले तर कपाटातील लॅपटॉप बाहेर टेबलावर काढून ठेवला. किरकोळ पैशांची चोरी केली. मात्र कार्यालयात किंमती असणारे संगणक व लॅपटॉप, महत्वाचे कागदपत्र न घेता निघून गेला. याठिकाणी कोयता सापडला. ही बाब मुख्याध्यापक एच. एन. अत्तार यांनी ग्रामस्थांच्या सकाळी शाळा उघडल्यावर निदर्शनास आणून दिली. खारेपाटण-शेर्पे रस्त्यावर शेर्पे हायस्कूल परिसरात हेमंत पवार यांच्या मालकीचे स्टेशनरी दुकान फोडले व दुकानाच्या आतील रोख रुपये ५०० व चिल्लर लंपास केली. दुकानाचा दरवाजा फोडण्यासाठी वापरण्यात आलेले टिकाव दुकानाच्या बाजूस टाकलेले होते. तसेच श्री देवी काळेश्वरी मंदिराची दानपेटी फोडून आतील रक्कम चोरून नेली. ही घटना मध्यरात्री घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी स्थानिक सरपंच संजय कापसे, ग्रामस्थ व पोलीस हवालदार रावराणे यांनी घटनेचा पंचनामा केला व अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. सायंकाळी ७.३० वाजता कणकवली येथून श्वानपथक व ठसेतज्ञ शेर्पे येथे दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत श्वानाने घटनास्थळ परिसरात माग काढला. शेर्पे येथील तिन्ही ठिकाणच्या चोऱ्या एकाच व्यक्तीने केल्या असल्याचा दाट संशय पोलीस व ग्रामस्थांच्यावतीने व्यक्त केला जात आहे. अज्ञात चोर हा भुरटा चोर असून पैशाच्या हव्यासापोटी त्याने केलेला हा प्रयत्न असल्याचे घटनेवरून प्रथमदर्शनी दिसते. खारेपाटण पोलीस स्टेशनचे रावराणे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर) शेर्पे गावात १ वर्षापूर्वी मंदिरातील फंडपेटी देवीचा उत्सव झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने फोडली होती. मात्र त्यावेळी कोणतीही तक्रार दाखल न केल्यामुळे पुन्हा अशाप्रकारची चोरी करण्याचे धाडस चोरट्याने केल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.