शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

हर्णै बंदरात मासेमारी बंद

By admin | Published: October 11, 2015 10:19 PM

दापोली तालुका : वादळाच्या इशाऱ्यामुळे नौका किनारीच

आंजर्ले : वादळाच्या इशाऱ्यामुळे हर्णै बंदरातील मासेमारी ठप्प झाली आहे. मच्छीमारांनी आपल्या नौका सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला नांगर टाकून उभ्या केल्या आहेत. अनंत चतुर्दशीनंतर मासेमारीच्या दुसऱ्या हंगामाला सुरूवात झाली. या हंगामात खलासी वार्षिक मजुरीवर काम करतात. पावसाला सुरूवात होईपर्यंत हा हंगाम चालतो. अनंत चतुर्दशीनंतर चार दिवसांनी हर्णै बंदरातील मच्छीमारी नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. या कालावधीत सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी, सरंगा असे जास्त पैसे मिळवून देणारे मासे मिळत असल्याने आॅक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. या हंगामात मुबलक मासे मिळाले नाहीत तर नौकामालक गाळात जातो. कारण कोणत्याही स्थितीत खलाशांची मजुरी त्याला द्यावीच लागते. त्यामुळे या काळात टिच्चून मासेमारी केली जाते. नुकतीच मासेमारीला सुरूवात झाली असताना वादळाचा इशारा मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी हर्णै बंदरातील मच्छीमारी नौका सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला उभ्या करण्यात आल्या आहेत, तर काहींनी आपल्या नौका सुरक्षिततेसाठी आंजर्ले खाडीत उभ्या केल्या आहेत. कारण वादळ झाल्यानंतर नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने हर्णै बंदर कुचकामी ठरते. कारण हर्णै बंदरात सुसज्ज जेटी नाही. जेटीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला आहे. परिणामी नौका सुरक्षित ठेवण्यासाठी त्या सुवर्णदूर्ग किल्ल्याच्या आडोशाला किंवा आंजर्ले खाडीत न्याव्या लागतात. दोन दिवस मासेमारी बंद असल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत वातावरण पूर्ववत होण्याची वाट मच्छीमार बघत आहेत. (वार्ताहर)गेल्या दोन दिवसांमध्ये खलाशांची मजुरी, अन्नधान्याचा भत्ता अंगावर पडला आहे. आणि मासेमारी झालीच नसल्याने उत्पन्नालाही फटका बसला आहे. लवकरच वातावरण पूर्ववत व्हावे, अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत.-विष्णू पावसे, मच्छीमार व नौकामालक