शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

सिंधुदुर्ग : ...तर राज्यमार्ग बंद करू, स्वाभिमानचा इशारा : आनंदव्हाळ येथे रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 1:25 PM

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मालवण-कसाल राज्यमार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आनंदव्हाळ पुलावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांना धारेवर धरत पावसाळी डांबराने खड्डे बुजवा, अन्यथा दोन दिवसांत राज्यमार्ग बंद करू, असा इशारा दिला.

ठळक मुद्देतर राज्यमार्ग बंद करू, स्वाभिमानचा इशारा आनंदव्हाळ येथे रास्तारोको आंदोलन

मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मालवण-कसाल राज्यमार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आनंदव्हाळ पुलावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांना धारेवर धरत पावसाळी डांबराने खड्डे बुजवा, अन्यथा दोन दिवसांत राज्यमार्ग बंद करू, असा इशारा दिला.आनंदव्हाळ पूल येथे स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन छेडले. यावेळी स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष बाबा परब, तालुकाध्यक्ष मंदार केणी, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, नगरसेवक यतीन खोत, अशोक चव्हाण, रवी टेंबुलकर, महेश जावकर, सतीश आचरेकर, संजय पाताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.मालवण-कसाल राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नी अशोक सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमय रस्त्यांबाबत जाब विचारला. अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत जांभ्या दगडाचा वापर करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मंदार केणी व यतीन खोत यांनी दगडाने मलमपट्टी नको तर पावसाळी डांबराने खड्डे बुजविले गेले पाहिजेत, असे ठणकावले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग