सिंधुदुर्गनगरी : तिलारी प्रकल्पग्रस्तांनी ‘वनटाईम सेटलमेंट’साठी पुकारलेले बेमुुदत आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशीही कायम राहिले. यावेळी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, पालकमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांनी आपण शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी व पोलीस भवनावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देताच दोन पोलीस निरीक्षकांसह तब्बल ७० पोलीस कर्मचारी पोलीस व्हॅनसह तैनात होते. उपोषणात १८० जणांनी सहभाग घेतला असून, यातील १२ जणांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना उपचारांसाठी आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...तर पालक मंत्री जबाबदार९४३ कुटुंबांना ‘वनटाईम सेटलमेंट’चा लाभ मिळालाच पाहिजे, या मागणीचे निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर यांनाप्रकल्पग्रस्तांनी पाठविले. शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास प्रकल्पग्रस्त आपला जीवही गमावतील. याला सर्वस्वी पालकमंत्री व जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, या आशयाचे निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर यांना प्रकल्पग्रस्तांनी पाठवले आहे.(प्रतिनिधी)काँग्रेसचे १०० कार्यकर्ते उपोषणास बसणारतिलारी प्रकल्पग्रस्तांना गुरुवारी सायंकाळी उशिरा समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, आम आदमी पक्षाचे द्वारकानाथ डिचोलकर यांनी भेट देत या उपोषणाला आमचा पाठिंबा असल्याचे सांगितले. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास काँग्रेसचे १०० कार्यकर्ते आपल्यासोबत उपोषणाला बसणार असल्याचे संजय नाईक यांनी सांगितले.
बारा उपोषणकर्ते रुग्णालयात दाखल
By admin | Published: November 19, 2015 9:13 PM