रत्नागिरी : पावसाळ्यात जून ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंच उसळणाऱ्या लाटांचे (हाय टाईड) वेळापत्रक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत ३ आॅगस्ट आणि ३१ आॅगस्ट रोजी सर्वांत उंच (अनुक्रमे ४.८६ मीटर, ४.८७ मीटर) लाटा उसळणार आहेत. १५ जून दुपारी ११.३९ वाजता ४.५१ मीटर, १६ रोजी १२.२३ वाजता ४.६१ मीटर, १७ रोजी १.0६ वाजता ४.६१ मीटर, १८ रोजी १३.४८ वाजता ४.५६. ३ जुलै रोजी दुपारी १.१८ वाजता ४.६२ मीटर, ४ रोजी दुपारी २ वाजता ४.७२ मीटर, ५ रोजी दुुपारी २.४४ वाजता ४.७५ मीटर, ६ रोजी दुपारी ३.२९ वाजता ४.६२ मीटर, ७ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता ४.५१ मीटर, ३१ रोजी दुपारी १२.१३ वाजता ४.५२ मीटर.१ आॅगस्ट रोजी दुपारी ३.५५ वाजता ४.७२ मीटर, २ रोजी दुपारी १.३७ वाजता ४.८४ मीटर, ३ रोजी दुपारी २.२० वाजता ४.८६ मीटर, ४ रोजी दुपारी ३.0४ वाजता ४.७५ मीटर, ५ रोजी दुपारी ३.५० वाजता ४.५१ मीटर, २९ रोजी सकाळी ११.४७ वाजता ४.५७ मीटर, ३० रोजी दुपारी १२.२९ वाजता ४.७७ मीटर, रात्री १२.५२ वाजता ४.५४ मीटर, ३१ रोजी दुपारी 0१.0९ वाजता ४.८७ मीटर लाटा उसळणार आहेत.१ रोजी पहाटे 0१.३७ वाजता ४.६५ मीटर, दुपारी १.५३ वाजता ४.८३ मीटर, २ रोजी पहाटे २.२४ वाजता ४.६१ मीटर, दुपारी २.३६ वाजता ४.६६ मीटर, २७ रोजी दुपारी ११.२१ वाजता ४.५४ मीटर, रात्री ११.५१ वाजता ४.५१ मीटर, २८ रोजी दुपारी १२.0३ वाजता ४.७१ मीटर, २९ रोजी पहाटे 00.३८ वाजता ४.७५ मीटर, दुपारी १२.४५ वाजता ४.७५ मीटर, ३० रोजी पहाटे 0१.२३ वाजता ४.८३ मीटर आणि दुपारी १.२६ वाजता ४.६७ मीटर पर्यंत लाटा उसळणार आहेत.आॅगस्ट महिन्यात ३ आणि ३१ तारखेला दुपारी सर्वांत उंच लाटा उसळणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने कळवण्यात आले आहे. पावसाळ््याच्या दिवसात नागरिकांनी या बाबत सर्व प्रकारे सावधानता राखावी म्हणून प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
आॅगस्टमध्ये दोनदा सर्वांत उंच लाटा
By admin | Published: June 12, 2015 10:55 PM