शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच लाख तिरंगे फडकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 15:41 IST

कणकवली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक आस्थापना व घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा झेंडा फडकवण्या ...

कणकवली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक आस्थापना व घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा झेंडा फडकवण्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर नियोजन करून ठिकठिकाणी अडीच लाख तिरंगा झेंडे फडकविले जाणार आहेत. सर्वसामान्य जनतेला तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिताच कणकवली पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात तिरंगा वितरणाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.कणकवली पंचायत समिती कार्यालयामध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर.जे.पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून शिरोडा, दांडी येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तिथेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यात शालेय स्तरावरत देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा, सायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हावे.तिरंगा फडकवत असताना प्लास्टिकच्या  तिरंग्याचा वापर करू नये.प्रशासकीय कार्यालयांसमोरील तिरंगा झेंडा सूर्यास्तापुर्वी उतरवण्याबाबत कार्यवाही केली जाईल. मात्र, घरोघरी फडकविण्यात येणारा तिरंगा १३ ते १५ या कालावधीत दररोज उतरवण्याची गरज नाही. मात्र, तिरंगा उभारताना किंवा उतरवताना ध्वज संहितेचे पालन करावे. ध्वजसंहिते बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.राजेंद्र दाभाडे म्हणाले, स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना' हर घर तिरंगा' उपक्रमा अंतर्गत तिरंगा झेंड्याची उभारणी करताना काळजीपूर्वक करावी. प्रजीत नायर म्हणाले, ग्रामीण भागात १ लाख ९२ हजार तिरंगा झेंडे वितरणाबाबतचे नियोजन झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतना 'हर घर जल' घोषित करण्यात येणार आहे. तर १६७ गाव ओडिएफप्लस घोषित करण्यात येणार आहेत.  देवगड किल्यात सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविला जाणार आहे. शिरोडा येथे महात्मा गांधीजींचे स्मरण करत असताना त्या ठिकाणी वाळू शिल्प पण साकारण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग