शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

८ पासून दोन आरक्षित रेल्वेगाड्या

By admin | Published: August 11, 2015 11:13 PM

पनवेल - चिपळूण डेमू गाडी

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात गणेशभक्तांची गर्दी कमी करण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावरून ८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव व लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या दोन विशेष आरक्षित गाड्या, तर पनवेल ते चिपळूण अशी एक डेमू रेल्वे गाडी सोडली जाणार आहे. याबाबतची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे क्र. ०१००५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव गाडी ८ सप्टेंबरपासून रात्री ००.५५ वाजता सुटणार असून, ती मडगावला दुपारी २.४० वाजता पोहोचणार आहे, तर रेल्वे क्रमांक ०१००६ ही दुपारी ३.२५ वाजता मडगावहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे रवाना होणार आहे. ही विशेष आरक्षित रेल्वे आठवड्यातून गुरुवारवगळता अन्य सहा दिवस धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०१०२५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी ही ८ सप्टेंबरला पहाटे ०५.३० वाजता करमाळीसाठी रवाना होणार आहे. ही गाडी करमाळी येथे सायंकाळी ५ वाजता पोहोचणार आहे. परतीची ही गाडी ९ सप्टेंबरला पहाटे ५.५० वाजता करमाळी येथून मुंबईकडे रवाना होईल व त्याच दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता पोहोचेल. विशेष आरक्षित दोन्ही गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिवीम व करमाळी येथे थांबणार आहेत. या रेल्वेगाड्यांचा गणेशभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पनवेल - चिपळूण डेमू गाडीपनवेल - चिपळूण - पनवेल मार्गावर ४, ५, ६, ८, ९, ११, १२, १३, १५, १६, १७, १९, २०, २१, २३, २४, २६, २७, २९, ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत डेमू गाडी धावणार आहे. ही गाडी सकाळी ११.१० वाजता पनवेलहून सुटेल व चिपळूणला दुपारी ४ वाजता पोहोचेल. चिपळूणहून ही गाडी सायंकाळी ५.३० वाजता पनवेलकडे रवाना होईल व रात्री १०.३० वाजता पाहोचेल. ही गाडी रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड व अंजनी या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला १२ डबे राहणार आहेत.