कणकवली : बीईएसटीच्या मदतीला मुंबईला गेलेल्या सिंधुदुर्गमधील अधिकाऱ्यांसहीत चालक , वाहकांपैकी एक अधिकारी व एक वाहक मुंबईत कोरोना बाधित आले आहेत . तर १५ दिवसांची सेवा बजावून परत आलेल्या चालक, वाहकांची कोरोना चाचणी करूनच कामावर घेतले जात आहे .दरम्यान, मुंबईत गेलेले कर्मचारी तेथे कोरोना बाधित झाल्याने चालक , वाहकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बीईएसटीच्या मदतीला एक तारखे दरम्यान, सिंधुदुर्गमधून सुमारे ३०० चालक, वाहक तसेच इतर अधिकारी, तांत्रिक कर्मचारी गेले होते. यापैकी एक तालुकास्तरीय अधिकारी व एक वाहक मुंबईत कोरोना बाधित आला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत .या कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीलाच झालेल्या गैरसोयीबाबतही नाराजी व्यक्त होत होती. आता पहिल्या टप्यातील चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी परतत असून दुसऱ्या टप्प्यात सुमारे २५० चालक, वाहक व इतर कर्मचारी मुंबईला रवाना झाले आहेत .दरम्यान, मुंबईत सेवा बजावून गावी आलेल्या चालक - वाहकांची कोरोना चाचणी करून नंतरच त्यांना सेवेत हजर करून घेण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र , या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेची साधने, मास्क , सॅनिटायझरचा पुरवठाही योग्य प्रकारे झाला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे . त्यामुळे मुंबईहून परतलेले व गेलेल्या कर्मचाऱ्यांसह त्यांचे नातेवाईकही चिंतेत आहेत .कणकवली तालुक्यात आठ रूग्ण आढळलेकणकवली तालुक्यात शुक्रवारी आठ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना बाधितांची संख्या १५९८ एवढी झाली आहे. तालुक्यात १९ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत ३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.नव्या रूग्णांमध्ये कणकवली शहर ४ , जानवली २ तर घोणसरी आणि फोंडाघाटमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी चाचणी केलेल्या शिक्षकांचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेस्टच्या मदतीसाठी मुंबईत गेलेले दोन एसटी कर्मचारी कोरोना बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 4:27 PM
coronavirus, mumbai, statetransport, sindhudurgnews बीईएसटीच्या मदतीला मुंबईला गेलेल्या सिंधुदुर्गमधील अधिकाऱ्यांसहीत चालक , वाहकांपैकी एक अधिकारी व एक वाहक मुंबईत कोरोना बाधित आले आहेत . तर १५ दिवसांची सेवा बजावून परत आलेल्या चालक, वाहकांची कोरोना चाचणी करूनच कामावर घेतले जात आहे .
ठळक मुद्देबेस्टच्या मदतीसाठी मुंबईत गेलेले दोन एसटी कर्मचारी कोरोना बाधित !मुंबईत उपचार सुरू, कणकवली तालुक्यात आठ रूग्ण