शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

मडुरा येथे रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 4:12 PM

मडुरा रेल्वे स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर उपराळनजीक रेल्वेच्या धडकेत दोन गवे जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडुरा रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. सायंकाळी उशिरा अथक परिश्रम घेत वनविभाग व रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोन्ही गव्यांचे दहन केले.

ठळक मुद्देमडुरा येथे रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठारमडुरा परिसरात गव्यांची संख्या मोठी

बांदा : मडुरा रेल्वे स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर उपराळनजीक रेल्वेच्या धडकेत दोन गवे जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडुरा रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. सायंकाळी उशिरा अथक परिश्रम घेत वनविभाग व रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोन्ही गव्यांचे दहन केले.जंगलातून रेल्वेमार्ग ओलांडून गवे शेतात प्रवेश करतात. मंगळवारी सकाळी मडुरा उपराळनजीक मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत मादी जातीचे दोन गवे जागीच ठार झाले. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती की गाभण गवा सुमारे शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन गटारात कलंडला. शंभर मीटर अंतरावर रक्ताचा सडा पडला होता.रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडुरा व पेडणे स्टेशन मास्तरांना दिली. सावंतवाडी वनपाल गजानन पाणपट्टे, आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, संग्राम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूने दरड असल्याने गवे बाहेर काढण्यासाठी वन व रेल्वे कर्मचाऱ्यांना अथक मेहनत करावी लागली.

मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. आर. साळगावकर यांनी शवविच्छेदन केले. दोन्ही गव्यांचे दहन करण्यात आले.मडुरा परिसरात गव्यांची संख्या मोठी असून गव्यांच्या कळपांकडून शेती बागायतीचे अतोनात नुकसान करण्यात येते. गेल्या काही वर्षांत याचठिकाणी दहाहून अधिक गवे रेल्वेच्या धडकेत ठार झाले आहेत. जंगलातून येणाऱ्या वाटेवर वनविभागाने काटेरी कुंपण उभारावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेAccidentअपघात