माणगाव : माणगाव खोºयात गुरुवारी सकाळी पावसाने जोर धरल्याने माणगाव-शिवापूर रस्त्यावरील दुकानवाड कॉजवेवर पाणी आले होते. उपवडे राणेवाडी येथील गोरखनाथ राजा कविटकर (३०) हा युवक कॉजवेवरून दुचाकीने येत असताना पाण्याच्या जोराबरोबर दुचाकी घसरल्याने ती पुलावरून पाण्यात कोसळली. मात्र, गोरखनाथ याने प्रसंगावधान राखून दुचाकी सोडून देऊन आपला जीव वाचविला. अन्यथा अनर्थ घडला असता.माणगाव खोऱ्यात गेले दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी आंबेरी पुलावर पाणी आल्याने दुपारी तीनच्या सुमारास दोन तास वाहतूक ठप्प होती. दुकानवाड-वसोली या कॉजवेवरही पाणी आले होते.
उपवडे येथील गोरखनाथ कविटकर हा युवक दुकानवाड कॉजवेवरून पाणी कमी असल्याने माणगावकडे येत होता. मात्र, कॉजवेच्या मध्यभागी पाण्याचा जोर वाढला. त्यामुळे गोरखनाथ दुचाकीसह वाहू लागला. प्रसंगावधान राखत त्याने हातातील दुचाकी नदीच्या पाण्यात सोडून दिली व आपले प्राण वाचविले.माणगाव खोऱ्यातील कॉजवेंची उंची वाढविण्याची मागणीदुकानवाड, वसोली व शिवापूर या परिसरातील सर्वच कॉजवेंची उंची कमी असल्याने वाहतुकीला ते धोकादायक आहेत. पावसाळ्यात बहुतांशी वेळा हे कॉजवे पाण्याखाली जातात आणि लोकांचा मोठ्या प्रमाणावर संपर्क तुटतो. याबाबत कॉजवेंची उंची वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी दुकानवाड पंचक्रोशीवासीयांनी केली आहे.