शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

जेटी हटावसाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

By admin | Published: March 03, 2015 9:28 PM

आरोंदावासीय आक्रमक : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी : ‘जेटी हटाव, मच्छिमार बचाव’, ‘जेटी हटाव, आरोंदा बचाव’ या सूचनांचे फलक घेऊन आरोंदा किरणपाणी खाडीकिनारी झालेल्या प्रदूषणकारी जेटी प्रकल्पास मंगळवारी आरोंदा मच्छिमार सहकारी संस्थेच्यावतीने विरोध करत जिल्हाधिकारी भवनासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मच्छिमार, ग्रामस्थ, शेतकरी, महिला उपस्थित होते.मंगळवारी आरोंदा मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे, सचिव शशिकांत पेडणेकर, कोकण प्रकल्पग्रस्त समन्वय समिती अध्यक्ष अविनाश शिरोडकर, आबा केरकर, संजय कोचरेकर, शुभांगी पेडणेकर, लक्ष्मी पेडणेकर, उमा बुडे, रुक्मिणी कोरगांवकर, मालवण श्रमिक मच्छिमार संघटनेचे रमेश धुरी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर, विकास केरकर यांच्यासह शेकडो आरोंदावासीय उपस्थित होते.आरोंदा जेटीविरोधात मंगळवारी मच्छिमार, ग्रामस्थ, महिला लाक्षणिक उपोषणासाठी जिल्हाधिकारी भवनासमोर जमले होते. यात विविध घोषणा देणारे सूचना फलकही उपोषणकर्त्यांच्या हातात होते व आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरोंदा मच्छिमारांना ८ फेब्रुवारी २०१५ पासून आरोंदा तेरेखोल खाडीत मासेमारी करण्यास पोलिसांनी दमदाटी केली. धमक्या दिल्या तरी या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, निरीच्या अहवालाप्रमाणे ज्या जेटी २०१० पूर्वी अस्तित्वात नव्हत्या अशा बेकायदेशीर ठरलेल्या जेटीवर कोळशासारखा प्रदूषणकारी घटक उतरविण्यात आला. त्या संबंधितांवर कारवाई करावी. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निरीने दिलेल्या अहवालात एम. सी. झेड. च्या नियमांचे उल्लंघन करून ३ नव्या जेटी बांधण्याचे काम केलेले आहे. त्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच ५ जानेवारी रोजी निरपराध आरोंदा ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची चौकशी करावी अशी मागणीही उपोषणकर्त्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे यावेळी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आरोंदा जेटीप्रश्नी लढा, सुरूच ठेवणार!मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने आता आम्ही शिमगोत्सवानंतर आरोंदा येथे बेमुदत साखळी उपोषण करणार आहोत. त्यानेही जाग आली नाही तर आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा देत राजकीय मंडळी जेटीसंदर्भात वारंवार ‘पलटी’ (भूमिकेत बदल) मारत असल्याने स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधीकडून त्यांची या जेटी संदर्भात लेखी स्वरूपात भूमिका घेतली जाईल. निवडणूक काळात कोणत्याही स्वरुपात जेटी होऊ देणार नाही असे आश्वासन देणारे आता खुर्चीत बसल्यानंतर आपले आश्वासन विसरून या मच्छिमारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.आरोंदा जेटीप्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील असा इशारा मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी रविकिरण तोरसकर, आबा केरकर, गोकुळदास मोटे यांनी दिला आहे.शासनाची दिशाभूल करून आरोंदा जेटी प्रकल्प सुरु आहे. या विरोधात तेथील स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थ, शेतकरी, महिला गेली साडेतीन वर्षे लढा देत आहेत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून आज लाक्षणिक उपोषणही मच्छिमार बांधवांनी केले. मात्र या उपोषणाची दखल घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळाला नाही. यापुढे आंदोलन आणखीन तीव्र होणार आहे. जेटीबाबत कागदपत्रे बोगस असून या विरोधात आपण न्यायालयात जाणार.- डॉ. जयेंद्र परूळेकर, काँग्रेस प्रवक्ते