सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर रविवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने शिवसेना ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.थोड्याच वेळात उध्दव ठाकरे गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यांचे प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने बांदा येथे तर शिवसेना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने सावंतवाडी येथे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते सावंतवाडीतील गांधी चौक येथे संवाद यात्रेला संबोधित करतील दरम्यान या संभास्थळाची सकाळीच खासदार विनायक राऊत यांनी पाहाणी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतर नाटकानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यांचा हा दौरा सावंतवाडीतून सुरू होणार आहे. उध्दव ठाकरे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गोवा येथील मोपा विमानतळावर दाखल होणार असून साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते सावंतवाडीत दाखल होतील त्याच्या सोबत रश्मी ठाकरे तसेच तेजस ठाकरे ही असणार आहेत.उध्दव ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
उध्दव ठाकरे हे सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर प्रथम त्याचे येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्याना समोर सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.या स्वागतासाठी खास क्रेन मागविण्यात आली असून क्रेन मधून उध्दव ठाकरे यांना हार घालण्यात येणार आहे.या स्वागता नंतर ठाकरे हे येथील गांधी चौकात संवाद यात्रेच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.उध्दव ठाकरे यांच्या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन खासदार विनायक राऊत यांच्याकडे असल्याने ते या मध्ये जातीने लक्ष घालत असून शनिवारी रात्री उशिरा त्यांनी सभास्थळाची पाहाणी केली त्यानंतर पुन्हा एकदा रविवारी सकाळी सभास्थळी जाऊन पाहाणी करत समाधान व्यक्त होत केले.ठाकरे मंत्री केसरकारांवर काय बोलणार याकडे लक्ष महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत या सत्तांतर नाट्यात एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या मंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर ठाकरे येत असल्याने केसरकर यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे