शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

उड्डान-३ अंतर्गत महाराष्ट्र राज्याला पर्यटनवृध्दीसाठी ५00 कोटी रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 4:24 PM

उड्डान- ३ अंतर्गत महाराष्ट्रातील पर्यटनवृध्दीसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. चिपी- सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विमानतळाचा या योजनेअंतर्गत समावेश केला आहे. सागरी किना-यावर विमान वाहतुकीची सुविधा व्हावी यासाठी देशातील ३५ सागरी किना-यांची निवड केली आहे. याचबरोबरच सीप्लेन या अंतर्गतही कोकणातील किना-यावर लवकरच ही सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.

ठळक मुद्देउड्डान-३ अंतर्गत महाराष्ट्र राज्याला पर्यटनवृध्दीसाठी ५00 कोटी रुपयांचा निधीचांदा ते बांदा योजनेअंतर्गत रेलोटेल साठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी: उड्डान- ३ अंतर्गत महाराष्ट्रातील पर्यटनवृध्दीसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. चिपी- सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विमानतळाचा या योजनेअंतर्गत समावेश केला आहे. सागरी किना-यावर विमान वाहतुकीची सुविधा व्हावी यासाठी देशातील ३५ सागरी किना-यांची निवड केली आहे. याचबरोबरच सीप्लेन या अंतर्गतही कोकणातील किना-यावर लवकरच ही सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.

सांवतवडी रेल्वे टर्मिनस विकासाबरोबर येथे रेलोटेल हे हॉटेल सुरु होणार आहे. यामधूनच रेल्वे, विमानसेवा, सीप्लेन यांच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन वाढीस लागणार असून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास केंद्रीय व्यापार, उद्योग व नागरी उड्डान मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे आयोजित समारंभात बोलताना व्यक्त केला.चांदा ते बांदा योजनेअंतर्गत रेलोटेल साठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या रेलोटेल हॉटेलचे भुमिपूजन तसेच रत्नागिरी रनिग रुमच्या वातानुकुलन यंत्रणेचे (रिमोटव्दारे) लोकार्पण सोहळ्यात श्री. प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, राजन तेली, पुष्पसेन सावंत, नकुल पारसेकर, अतुल काळसेकर, अन्नपुर्णा कोरगावकर, कोकण रेल्वेचे एमडी श्री. गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रेलोटेलची संकल्पना विशद करुन पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, पर्यटनकांना निवासाची चांगली सुविधा निर्माण व्हावी याचबरोबर चांगल्या दजार्चे कोकणी खाद्य पदार्थ मिळावेत यासाठी हे ४० खोल्यांचे हॉटेल उभारले जात आहे. फुड कोर्टच्या माध्यमातून उच्च दजार्चे खाद्य पदार्थ मिळावेत याचबरोबर स्थानिक महिलांनाही या हॉटेल च्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यास मदत होणारआहे. राजधानी एक्सप्रेस बरोबरच इतर ट्रेनही सावंतवाडी येथे थांबाव्यात तसेच गोव्यातून कारवारला जशी डेमो ट्रेन सुरु केली आहे याच धर्तीवर गोव्यातून सिंधुदर्गलाही डेमो ट्रेन सुरु करण्याबाबत प्रभू साहेबांनी प्रयत्न करावेत अशी त्यांनी यावेळी विनंती केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे असे सांगुन खासदार विनायक राऊत म्हणाले की, सांवतवाडी टर्मिनस येथे उभ्या राहत असलेल्या रेलोटेल हॉटेलच्या माध्यमातून काही अंशी पर्यटकांची गरज पुर्ण होण्यास मदत होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या एक्सप्रेस गाड्यांना जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, सांवतवाडी या स्थानकावर थांबे मिळावेत.जिल्ह्यातून जाणा-या मांडवी, कोकण कन्या, तुतारी आदी गाड्याना बहुतांशी वेळेला साईडींगला टाकली जाते. हा कोकणातील रेल्वे प्रवाशाच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. याबाबत कोकण रेल्वेच्या प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी. तेजस एक्सप्रेसला सावंतवाडी व कणकणली येथे थांबा मिळावी अशीही त्यांनी शेवटी विनंती केली. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्ग