मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी कोकण परिमंडलातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारपट्टी भागात महावितरणने अंडरग्राउंड वीजवाहिनीचा प्रस्ताव सादर केला आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी सुमारे ७० कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे तसेच गुहागर व रत्नागिरी शहरांतील वीजवाहिन्या भूमिगत होणार आहेत. वादळामुळे होणारे वीजवाहिन्यांचे नुकसान तसेच अपघात टाळण्यासाठी महावितरणने हा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील समुद्रकिनार्याजवळील गावांना वादळाचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान तर होतेच, तसेच ग्राहकांनाही मोठा त्रास होतो. नुकसान होत असल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांचा निर्णय घेण्यात आला. समुद्रकिनार्यापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये, शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. वादळामुळे ओव्हरहेड लाईन कोसळून होणारे नुकसान व पर्यायाने खंडित होणार्या वीजपुरवठ्यास भूमिगत वीजवाहिन्या पर्याय ठरू शकतात. त्यामुळे कोकण झोनतर्फे मुख्यालय ‘प्रकाशगड’कडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तेथून हा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. जेणेकरून २०१५-१६ मध्ये वीजवाहिन्यांच्या कामास प्रारंभ होणार आहे. रत्नागिरी शहरात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. गणपतीपुळे येथे सहा ते साडेसहा हजार, गुहागरमध्ये ३० हजार, तर मालवणमध्ये ३५ हजार ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. भूमिगत स्वरूपात उच्चदाब व लघुदाब वाहिनी टाकण्यात येणार आहे.
किनारपट्टीच्या वीजवाहिन्या होणार भूमिगत मालवण, गणपतीपुळे, रत्नागिरी शहर, गुहागरमधील वीजवाहिनी होणार अंडरग्राउंड
By admin | Published: May 19, 2014 12:32 AM