वेंगुर्ला : मागील सभेत नगरसेवक संदेश निकम यांनी नगरपरिषद अभियंता यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविषयी अधिकारीवर्गाने पत्राद्वारे त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यासंदर्भात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी यावेळी त्यांना समज देऊन माफ करण्यात आले असून यापुढे असे वर्तन घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे झालेल्या सभेत सांगितले.वेंगुर्ला नगरपरिषदेची सभा मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, प्रकाश डिचोलकर, दादा सोकटे, शितल आंगचेकर, कृतिका कुबल, श्रेया मयेकर, कृपा गिरप-मोंडकर, स्नेहल खोबरेकर, पूनम जाधव, सुमन निकम, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.नूतन मच्छीमार्केटच्या विद्युतीकरणाचे काम शिल्लक असून ते तत्काळ सुरु करून येत्या प्रजासत्ताकदिनी मच्छीमार्केटचे उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले. लॉकडाऊन काळात कंपोस्ट डेपोतील कोळसाकांडी प्रकल्प बंद ठेवण्यात आल्याने त्यांना ९ कामगारांचे वेतन व इतर खर्च असे एकूण साधारण १५ लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे त्यांना या काळात आलेल्या वीज बिलात सवलत मिळण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. यावर एकूण वीज बिलापैकी १ लाख रुपये भरून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून एप्रिल २०२१ पासून नवीन भाडेकरार करण्यात येणार आहे.निशाण तलाव धरणाचे काम सुरू असल्याने आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात २ दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच नागरिकांकडून होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती करून प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली. शहरात सध्या जेथे पाईपलाईनचे काम सुरू आहे त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा कर्मचारी सागर चौधरी यांनी दिली.शहरात स्वच्छता मोहीम राबविणारस्वच्छ भारत अभियानअंतर्गत नागरिकांची सोय करण्यासाठी मोड्युलर टॉयलेट खरेदी करण्यासंदर्भात चर्चा होऊन नगरसेवकांनी आपल्या भागात जिथे वर्दळीचे ठिकाण आहे तेथे निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी कंपोस्ट डेपो येथे येणाऱ्या दुर्गंधी संदर्भात नाराजी व्यक्त केली. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून पाणबुडी प्रकल्पाचे कार्यालय दूरध्वनी कार्यालयाजवळील जागेत उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली. दर शनिवारी सर्व नगरसेवक आणि आपण स्वतः शहरात स्वच्छता मोहीम राबविणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्ष गिरप यांनी दिली.
अभियंत्याशी गैरवर्तन प्रकरणी निकम यांना दिली समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 6:32 PM
Vengurla NagerParishad sindhudurg - मागील सभेत नगरसेवक संदेश निकम यांनी नगरपरिषद अभियंता यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविषयी अधिकारीवर्गाने पत्राद्वारे त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यासंदर्भात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी यावेळी त्यांना समज देऊन माफ करण्यात आले असून यापुढे असे वर्तन घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे झालेल्या सभेत सांगितले.
ठळक मुद्देअभियंत्याशी गैरवर्तन प्रकरणी निकम यांना दिली समजवेंगुर्ला नगरपरिषद सभेत नगराध्यक्षांची माहिती