देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे या प्रशालेतील इयत्ता आठवी-ब च्या वर्गातील साक्षी शेट्ये, हर्षल पाटील व सुकिर्ती तेली हे विद्यार्थी सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकल्याबद्दल इयत्ता आठवी-ब व त्यांच्या वर्ग मंत्रिमंडळाने या शिष्यवृत्ती यशवंतांची मुलाखत घेऊन त्यांच्या यशाचे विविध कंगोरे उलगडण्याचा अभिनव उपक्रम गोगटे प्रशालेत झाला. साक्षी शेट्ये व हर्षल पाटील प्राथमिक शाळा दहिबाव नं. १ या शाळेतून सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. ते सध्या जामसंडे हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी- ब च्या वर्गात अध्ययन करीत आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत साक्षी शेट्ये व हर्षल पाटील याने जिल्ह्याच्या ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत अनुक्रमे नववा व दहावा क्रमांक पटकावला आहे, तर सुकीर्ती तेली हिने देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.साक्षी शेट्ये, हर्षल पाटील, सुकीर्ती तेली या शिष्यवृत्ती गुणवंतांनी गाव, शाळा, कौटुंबिक वातावरण, परीक्षा नियोजन, छंद, भविष्यातील संकल्प या घटकांवर मुलाखतीतून प्रथितयश व्यक्तींसारखी उत्तरे देऊन आपली संवाद कौशल्ये उजळवून टाकली. शिष्यवृत्ती यशवंतांची वैभवी भुजबळ, ऋतुजा लिमये व ऋतुजा चोपडेकर या मुलाखतकारांनी प्रकट मुलाखत घेतली. अक्षता गावडे हिने सूत्रसंचालन, तर रिंकुकुमारी माली हिने आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)मुलाखतकारांनीयशवंतांना केले बोलतेशिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती यशवंतांनी कोणती मेहनत घेतली, त्यांच्या यशाचे कोण-कोण शिलेदार आहेत ? त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, धीटपणा, बुिद्धमत्तेची शिघ्रता, ठामपणा, विनम्रपणा, त्यांच्या ज्ञानाची व अभिव्यक्तीची कसोटी घेण्यासाठीच आठवी-ब च्या मंत्रिमंडळाने वर्गशिक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतकारांकरवी यशवंतांना बोलते केले.भेटवस्तू देऊन सन्मानमुलाखत हा मानवी व्यक्तिमत्त्वाच्या साक्षात अभिव्यक्तीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. चांगला संवाद साधण्याची संधी म्हणजे मुलाखत होय. आजकाल सर्वत्र मुलाखती या थोरामोठ्यांच्या होताना दिसतात. समाजात शालेय विद्यार्थ्यांच्या यशाला महत्त्व कमी देण्याची मानसिकता पाहावयास मिळते. समाजाची ही मानसिकता सकारात्मकतेत बदलावी, या उद्देशाने आठवी-ब च्या वर्गाने हा जो अभिनव उपक्रम राबविला त्याचे मुख्याध्यापक अ. प. सोमण यानी कौतुक करून शिष्यवृत्ती यशवंतांना शैक्षणिक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
उलगडले यशाचे कंगोरे
By admin | Published: August 07, 2015 11:56 PM