शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 1:38 PM

भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली.

सुधीर राणेकणकवली : ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती अवैध होती. ती अवैध मार्गाने मिळवलेली होती. तीच जप्त केली गेली आहे असे स्पष्ट मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.राणे कुटुंबीयांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आज, शुक्रवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला केले. त्याचेच फळ त्यांना आता मिळतेय. त्यांनी जे लोकांसोबत केले. ज्या प्रकारे विश्वासघात केला. तसेच त्यांच्यासोबतही घडतेय. त्यांचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे त्यांच्याच कर्माचेच फळ आहे.सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप नाहीखासदार संजय राऊत किती बोलत होते, आता तर जेल मध्ये आहेत. ईडीने त्यांच्याकडील अवैध मालमत्ता जप्त केली. असेच लोक भाजपविरोधात बोलत आहेत. पण याचा आमच्यावर काहीच परिणाम नाही. आमचे सरकार, आमचा पक्ष  कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करत नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत.भाजपने नितीशकुमारांना हटवले नाहीमहाराष्ट्रात आणि बिहारमध्ये भाजपबरोबर युती करून निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याच बरोबर सरकार बनवण्यात आले. यात भाजपची भूमिका कुठे चुकीची होती? बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांना हटवले नाही असेही ते म्हणाले.भाजपसाठी निवडणुका महत्वाच्या नाहीतभारतीय जनता पार्टी कधी निवडणुकीची तयारी करत नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत तर लोकांसाठी सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे असे म्हणत त्यांनी भाजपचा येत्या काळातील उद्देश स्पष्ट केला.जे.पी.नड्डांच्या वक्तव्याचा विपर्यासजे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले नव्हते तर त्यांनी अस सांगितले होते की,जर प्रादेशिक पक्ष जनतेसाठी देशपातळीवरच्या सर्व प्रकारच्या योजना राबिण्यासाठी तयार नसतील आणि सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत पोचत नसतील तर निश्चितपणे याचे नुकसान प्रादेशिक पक्षांना होईल. असेही केंद्रीय मंत्री मिश्रा यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHome Ministryगृह मंत्रालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे