ओरोस : मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी सक्षम कारण लागते. मात्र, सध्यस्थितीत तशी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही. केवळ आपले मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जाव्यात, असे त्यांना वाटत असेल; पण तसे होत नसल्याची टीका करतानाच त्यांना घरात बसून बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण म्हणाले की, मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती यावी लागते. तशी परिस्थिती असल्यास मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात.
मात्र कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? काही कारण असलं पाहिजे ना. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारण सांगावे की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? पण तसे नाही होत. त्यांना वाटत असेल आपलं मुख्यमंत्री पद घेतलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात तर तसे होत नाही. त्यांना घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघातही नारायण राणेंनी यांनी यावेळी केला आहे.
१० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेलेमातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले. त्यांना नीट बोलता येत नाही अशा व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असं मला वाटत नाही. कारण अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांना बोलताना येत नसल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली आहे.