सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे काल गुरुवारी रात्री उशिरा कणकवलीत दाखल झाले आहेत. नारायण राणे कणकवली येथील आपल्या ओम गणेश बंगल्यावर तळ ठोकून आहेत. आमदार नितेश राणे सुद्धा कणकवलीत असल्याची चर्चा आहे.सर्वोच्च न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना दहा दिवसात पोलिसात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. आज शुक्रवार असून उद्या शनिवार व रविवारी कोर्टाला दोन दिवस सुट्टी असल्याने नितेश राणे हे कदाचित सोमवारी कणकवली पोलिसांनी ठाण्यात स्वतःहून हजर होऊन अटक करून घेतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे.आमदार राणे यांना अटक होवू नये यासाठी मंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतील बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. नितेश राणे नेमकी काय भूमिका घेतात आणि स्वतःला अटक करून घेतात का ? यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत,‘ओम गणेश’वर हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:23 AM