शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

महायुतीकडून एकता आघाडीचा धुव्वा

By admin | Published: April 17, 2017 11:10 PM

१४ पैकी १२ जागा जिंकल्या; रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत सात संघटनांच्या महायुती पॅनेलने १४ पैकी १२ जागा जिंकत एकता आघाडीचा धुव्वा उडविला. सत्ताधारी एकता आघाडीला केवळ २ जागा राखता आल्या. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह महायुतीतील इतर शिक्षक संघटनांनी निकालानंतर जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ६५०७ पैकी ६३४६ इतके प्रथमच विक्रमी मतदान झाले. या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, केंद्रप्रमुख सभा व पदवीधर शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक समिती आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी महायुती स्थापन करून सत्ताधारी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या एकता आघाडी विरोधात निवडणूक लढविली.या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघाच्या ९ जागांपैकी ७ जागांवर महायुतीने, तर २ जागांवर एकता आघाडीने विजय मिळविला. जिल्हा क्षेत्रासाठी ५ जागा होत्या. या पाचही जागा महायुतीने जिंकल्या. त्यातील सर्वसाधारण जागेवर महायुतीचे प्रकाश गजानन पाध्ये यांना ३६०६, तर आघाडीचे अजित लक्ष्मण भोसले २७१५ मते मिळाली. अनुसूचित जाती/जमाती या राखीव मतदार क्षेत्रात आघाडीचे संदीप दत्तात्रय कांबळे (२७३५) यांना महायुतीचे अनंत धोंडू कदम (३५९१) यांनी ८५६ मतांनी पराभूत केले. राखीव महिला प्रतिनिधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या नसरीन मुश्ताक खडस यांनी आघाडीसह २ अपक्ष अशा ३ उमेदवारांचा पराभव केला. यामध्ये खडस यांना ३५२३ मते मिळाली, तर यामध्ये साक्षी प्रकाश गांधी, माधुरी रमाकांत देवरुखकर, स्नेहल सुधीर यशवंतराव पराभूत झाले. इतर मागास प्रतिनिधीच्या जिल्हा क्षेत्रासाठी ६३३० मतदान झाले. यामध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत गोविंद पावसकर यांना ३८२६, तर आघाडीचे विनायक काशीनाथ वाळंज यांना २५०४ मते मिळाली. पावसकर यांनी वाळंज यांच्यावर १३२२ मतांनी दणदणीत विजय मिळविला. शहरातील मराठा भवन येथील मतमोजणी केंद्राच्या बाहेर शिक्षकांनी गर्दी केली होती. यामध्ये सर्वच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महायुतीच्या विजयानंतर विजयी उमेदवारांची भगवे फेटे बांधून मिरवणूक काढण्यात आली होती. गुलाल उधळत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षकांनी जल्लोष केला. (शहर वार्ताहर)तालुकानिहाय विजयी संचालकमंडणगड-पवार शांताराम अर्जुन (१९५), चांदिवडे सचिन गोविंद (१२४), दापोली- मोरे अविनाश खंडू (२५८), शिगवण रमाकांत रघुनाथ (३४२). खेड- उत्तेकर संतोष रामचंद्र (३३३), सुर्वे संजय कमलाकर (२८८), हेळगावकर प्रकाश हरी (१५९). चिपळूण- मोरे बळीराम जयराम (५३५), सुर्वे संतोष श्रीधर (४५३). गुहागर- नेटके प्रमोद राजाराम (१२२), मंडले स्वप्निल जगन्नाथ (११८), धामणसकर संतोष गंगाराम (६४), रामाने सुनील दत्ताराम (१८४). संगमेश्वर- रणसे सुरेंद्र गणपत (२९५), महाडिक दिलीप रामचंद्र (६८९). रत्नागिरी- देवळेकर दिलीप गणपत (५३४), साळवी सुजित शांताराम (३६२). लांजा- डांगे संजय मारुती (३३५), पावणे संतोष गंगाराम (१९५). राजापूर-जाधव विलास गंगाराम (३६३), गोसावी मेघनाथ एकनाथ (३१०), तावडे अरविंद पुंडलिक (६८).