शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

इंटरनेट, सोशल मीडिया जपून वापरा

By admin | Published: December 24, 2015 10:21 PM

हेमंतकुमार शहा : आनंदीबाई महाविद्यालयात ‘सायबर क्राईम’बाबत मार्गदर्शन

वैभववाडी : इंटरनेट, मोबाईल आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सायबर क्राईमची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर डोकेदुखी ठरत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग जेवढा चांगल्यासाठी होतो, त्याहून भयंकर दुष्परिणाम गैरवापरामुळे भोगावे लागतात. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्यासाठी युवा पिढीने इंटरनेट व सोशल मीडियाचा जपून वापर करावा, असे आवाहन कुडाळचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी येथील आनंदीबाई महाविद्यालयात केले. पोलीस खात्यामार्फत येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अविनाश पालवे, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक आर. डी. गुरव, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे आदी उपस्थित होते. शहा म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्याला व पोलीस समाज घडवत असतो. त्यामुळे विद्यार्थिदशेत एकदा चुकले तर पुढे सगळे चुकत जाते. सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल केली तर जीवन चांगले घडते. इंटरनेट, मोबाईल काळाची गरज आहे; परंतु त्याचे दुष्परिणामही जाणून घेण्याची गरज आहे. सोशल नेटवर्किंगचा योग्य उपयोग केला नाही, तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आपण टाकलेल्या पोस्टमुळे एखाद्याची बदनामी होऊ शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी त्याच्या गैरवापराचे दुष्परिणाम प्रत्येकाने समजून घ्यावेत. कोणतेही तंत्रज्ञान चांगल्या लोकांच्या हाती लागले तर त्याचा वापर चांगल्यासाठीच होतो. परंतु ते चुकीच्या लोकांच्या हातात पडले तर विघातक कामासाठी त्याचा वापर केला जातो. ते म्हणाले की, समाजातील नाराज लोक सायबर क्राईमकडे वळतात. त्यातही १४ ते ३0 वयोगटाचा समावेश अधिक आहे; परंतु कायद्यात कोणालाही माफी नाही. याचे भान ठेवले पाहिजे. त्यामुळे इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. कोणाचाही डेटा मिळवून तपासण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींची संगत करुन आयुष्य उद्ध्वस्त करुन घेऊ नका. विद्यार्थ्यांचे विचार प्रगल्भ असले पाहिजेत. ‘धूम’ स्टाईलने गाडी चालवून क्षणिक आनंद मिळविण्यापेक्षा चांगल्या मार्गाने नाव कमवा. समाजाला आदर्श तरुणांची गरज आहे. (प्रतिनिधी) वेळच आयुष्य पालटते! हेमंतकुमार शहा यांनी वेळेला किती किंमत आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून देताना आपल्याच आयुष्यातील किस्सा सांगितला. ते म्हणाले, विश्वास नांगरे-पाटील आणि मी एकाच ठिकाणी शिकत होतो. ते एकेका मिनिटाचा पुरेपूर सदुपयोग करीत असत. मी व काही मित्र थोडाफार ‘टाईमपास’ करून अभ्यास करत होतो. प्रत्येक मिनिटाला महत्त्व देणारे नांगरे-पाटील आयपीएस बनले. मी अजून पोलीस निरीक्षकच आहे. यावरून वेळच आयुष्य पालटते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेची किंमत ओळखायला शिका, असे त्यांनी सांगितले.