शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

शिक्षक भरतीनंतरही सिंधुदुर्गात रिक्त शिक्षक पदांचे ग्रहण, ३८७३ मंजूर पदांपैकी किती पदे भरली.. जाणून घ्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 19, 2024 6:49 PM

उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार ?

मनोज वारंगओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली शिक्षक पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया होऊनही केवळ ५१३ एवढीच पदे नव्याने भरली आहेत. जिल्ह्यातील एकूण ३८७३ मंजूर पदांपैकी भरती प्रक्रियेनंतर ३२०४ एवढी पदे भरली आहेत. अद्यापही ६६९ पदे रिक्तच राहिली आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीनंतरही जिल्ह्याचे रिक्त पदांचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.गेली अनेक वर्षे शिक्षक भरती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यातच आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये आणखीनच भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८७३ एवढी शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ २६९१ एवढी पदे कार्यरत होती तर सुमारे ११८२ एवढी पदे रिक्त झाली होती.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळलेही पदे भरावीत यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने, उपोषणे सुरू झाली होती. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. याचा विचार करून अखेर शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेत शिक्षक पद भरती प्रक्रिया पार पाडली. या भरती प्रक्रियेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ५१३ एवढीच पदे भरली गेली.

पदवीधर १४२, उपशिक्षक ३७१ पदे भरलीसिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत पदवीधर शिक्षकांची १४२ पदे तर उपशिक्षकांची ३७१ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही पदवीधर शिक्षकांची २३३ व उपशिक्षकांची ४३६ एवढी पदे रिक्त राहिली आहेत. अद्यापही ६६९ एवढी पदे रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असली तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रिक्त पदांचे ग्रहण सुटले नसल्याचे दिसून येत आहे.

उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार ?सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था दर्जेदार व सुरळीत पार पाडण्यासाठी अद्यापही ६६९ एवढी रिक्त पदे भरण्याची गरज असून, उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तर उर्वरित पदांवर स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना संधी द्यावी, अशीही मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षकSchoolशाळा