ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १९ हजार १०६ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यात ९७ हजार ४९७ जणांनी पहिला, तर २७ हजार ६०९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील ८२५ जणांना आज पहिला डोस देण्यात आला. आतापर्यंत या वयोगटातील १५१४ जणांना लस देण्यात आली आहे तसेच बारा हजार २०० डोस शिल्लक आहेत.जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात सुरुवात केल्यापासून आतापर्यंत एक लाख १९ हजार १०६ जणांना लस देण्यात आली आहे. यात ९७ हजार ४९७ जणांना पहिला, तर २७ हजार ६०९ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
यात आतापर्यंत १५ हजार ५८९ आरोग्य कर्मचाऱ्यांना, दहा हजार ६२५ फ्रंटलाइन वर्कर्स यांना, १८ ते ४४ वयोगटातील १५१४ नागरिकांना, ४५ ते ६० वयोगटातील ३३ हजार ४२३ नागरिकांना, तर ५७ हजार ९४९ एवढ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली.
जिल्ह्यात ४२०० कोविशिल्डचे, तर आठ हजार कोव्हॅक्सिनचे असे एकूण बारा हजार २०० डोस शिल्लक असून, हे डोस उद्या दिले जाणार आहेत.