-अनंत जाधव सावंतवाडी - भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले. त्यावेळी रत्नागिरी ऐवजी सिंधुदुर्ग वर एकमत झाले.आणि 1982-83 च्या दरम्यान देवगड जामसंडेत सभा घेण्यात आली. वाजपेयी दहा तासाचा प्रवास करत मुंबई हून कोल्हापूर मार्गे जामसंडेत आले होते. एवढ्या लांबचा प्रवास बघून वाजपेयी सहकाऱ्यांना प्रवासातच म्हणाले होते की एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना. पण सहकारी त्याना धीर देत होते. आणि जेव्हा प्रत्यक्षात वाजपेयी सभास्थळी दाखल झाले तेव्हा ते गर्दी बघून चांगलेच अवाक झाल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या राजकीय कारकिर्दीत फक्त एक वेळाच सिंधुदुर्ग मध्ये आले होते.असे ही त्यांनी सांगितले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात निधन झाले आहे.त्यांच्या निधनानंतर भाजपा नेते माधव भंडारी यांनी वाजपेयीच्या सिंधुदुर्ग भेटीच्या आठवणी ताज्या केल्या यावेळी भंडारी म्हणाले,1980 चे दशक असावे मुंबई पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयींची निवड झाली होती.आम्ही काही पदधिकारी जिल्हयातून वाजपेयी यांची भेट घेण्यास गेलो होतो.यावेळी राज्यातील काही नेते सोबत होते.आम्ही सिंधुदुर्गमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा वाजपेयीनी कोणताही संकोच न बाळगता येण्याचे मान्य केले. आम्हाला धक्काच बसला सभेची तारीख ही ठरली कुठली पुढे निवडणूक नव्हती तरी वाजपेयी 1982 -83 च्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हयात आले.येतना कार ने ते मुंबई तून कोल्हापूर मार्गे सिधुदुर्ग मध्ये येण्यास निघाले वाजपेयी कोल्हापूरातून देवगड कडे निघाले तेव्हा रस्ता तसेच आजबाजूचा परिसर बघून वाजपेयी आपल्या सहकार् याना म्हणाले.एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना तेव्हा सोबतचे सहकारी काही क्षणासाठी गप्प बसले पण नंतर वाजपेयीना धीर देत गर्दी होईल असे सांगितले प्रत्यक्षात वाजपेयी सभे च्या दिवशी दुपारच्या सुमारास जामसंडेत पोचले तेव्हा सभास्थळी समोरील गर्दी बघून वाजपेयी चांगलेच अवाक झाले.
सभा संपल्यानंतर तत्कालीन भाजपाचे नेते आप्पा गोगटे च्या घरी जेवण घेतले. तेथे ही त्यांनी सभेला वीस ते पंचवीस हजार लोक भर उन्हात आले होते.त्यानी आयोजकांचे कैतुक केले होते. सिंधुदुर्गच्या आठवणी जागवत किती लांबचा हा प्रवास, असे म्हणत नंतर वाजपेयी आल्या मार्गे म्हणजेच कोल्हापूर हून मुंबई कडे रवाना झाले होते. त्यानंतर दोन ते तीन वेळा रत्नागिरी मध्ये आले पण पुन्हा केव्हा ही वाजपेयीना सिंधुदुर्गमध्ये येण्याचा योग आला नाही, असे भंडारी यांनी सांगितले.