वेंगुर्ले : तालुक्यातील वजराठ ग्रामपंचायतीला शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पूर्ण जळून खाक झाली. रात्री या आगीने रौद्र्ररूप धारण केल्याचे ग्रामपंचायतीच्या शेजारीच असलेले हरिश्चंद्र्र कांदे यांच्या निदर्शनास ही घटना आली. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. पहाटे ४ वा. वेंगुर्ले पालिकेच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत ग्रामपंचायत कार्यालयात गावचे संपूर्ण नोंदी असलेले दस्तऐवज, जलस्वराज्य अभियान, एम. आर. ई. जी. एस., जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर, आदी महत्त्वाची असलेली सगळी कागदपत्रे, रेकॉर्ड जळून बेचिराख झाले. एकंदरीत आगीमुळे वजराठ ग्रामपंचायतीचे सुमारे १७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कार्यालयातील संंगणकाच्या ठिकाणाहून शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ग्रामपंचायत इमारतीच्या बाहेर आगी भडकत असताना रात्री ३ वा.च्या सुमारास शेजारी राहत असलेल्या हरिश्चंद्र्र कांदे यांच्या नजरेस ही घटना पडली. त्यांनी तत्काळ आपल्या शेजारील ग्रामस्थांना राची माहिती देत त्वरित ग्रामस्थ अण्णा वजराठकर यांना कळविले. त्यावरून ग्रामस्थांनी आपल्या घरातील, तसेच विहिरीचे पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पालिकेच्या अग्निशामक बंबाला बोलावून पहाटे ४ वा. आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने आगीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या पोस्ट कार्यालयाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. तर बाजूचे ग्रामपंचायतीचे सभागृह मोठ्या नुकसानीपासून वाचले. सकाळी या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर, गटविकास अधिकारी माधुरी परीट व विस्तार अधिकारी गोसावी यांनी ग्रामपंचायतीला भेट देत पाहणी केली. यावेळी सरपंच रेश्मा सावंत, उपसरपंच प्रशांत परब, ग्रामसेवक एस. ए. गावडे, सदस्य मनोहर परब, वसंत परब, ममता परब, प्रेमानंद भोसले, मंगेश परब, अण्णा वजराठकर, रसिका परब, उत्कर्षा सोन्सुरकर, लक्ष्मी दळवी, दिंगबर पेडणेकर, आपा परब, राजन परब, पोस्ट खात्याचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्रामपंचायत झाले जळून खाकया आगीत ग्रामपंचायत इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच छप्परही जळून खाक झाले आहे. त्याशिवाय कार्यालयातील तीन लोखंडी कपाटे, एक संगणक, एक सब मर्सिबल मोटर पंप, सहा प्लास्टिक खुर्च्या, दोन लाकडी टेबल व खुर्च्या, टेबल फॅन, आदींचे मोठे नुकसान झाले आहे.
वजराठ ग्रामपंचायत जळून खाक
By admin | Published: January 13, 2017 10:35 PM