शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

काळसेतील विविध विकासकामे ठरताहेत रोल मॉडेल

By admin | Published: October 04, 2015 10:16 PM

गोसावीवाडीवासीयांचा उपक्रम : जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले कौतुक

चौके : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे, लोकवर्गणीतून साकारलेल्या विविध विकासकामांमुळे ही वाडी तालुक्यात रोल मॉडेल ठरत आहे.गोसावीवाडीच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणारे वाडीतील सुपुत्र तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार शरद गोसावी यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांची गणेश विसर्जनाची अडचण लक्षात घेऊन चालू वर्षी गोसावीवाडीतील सिद्ध महापुरुष मंदिरानजीक सुसज्ज पक्का बंधारा, विस्तीर्ण आणि सुशोभित गणेश विसर्जन घाट, निवारा शेड आणि वाडीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्राम, दत्ताराम गोसावी यांच्या स्मरणार्थ आजी-आजोबा उद्यानाची निर्मिती करण्यात आली.या विकासकामांच्या निर्मितीसाठी मुंबई मंडळ, स्थानिक मंडळ तसेच लोकांनी दिलेली वर्गणी आणि वाडीतील तरुण तसेच सर्व ग्रामस्थ महिला यांनी श्रमदान करून आपापले योगदान दिले आहे. गणेश विसर्जन घाटाचे उद्घाटन वाडीचे प्रमुख मार्गदर्शक मुंबईचे निवृत्त तहसीलदार मोहन नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी विनोद गोसावी, शरद गोसावी, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष शशांक गोसावी, सेक्रेटरी प्रदीप गोसावी, खजिनदार सुहास गोसावी, सतीश गोसावी, सिव्हील इंजिनिअर योगेश राऊळ, माजी सभापती राजेंद्र परब, कैलास गोसावी, दिनकर गोसावी, विनायक गोसावी, शामसुंदर गोसावी, काशिनाथ गोसावी, संतोष सावंत, समीर गोसावी, प्रभाकर गोसावी, पंकज गोसावी, जितेंद्र गोसावी, राजेंद्र गोसावी, तुषार गोसावी उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक दिनकर गोसावी आणि विनायक गोसावी यांच्या हस्ते फीत कापून आजी- आजोबा उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे तहसीलदार विनोद गोसावी यांच्या हस्ते याच उद्यानातील कधीही न आटणाऱ्या जलस्रोताचे पूजन करण्यात आले. (वार्ताहर)पावित्र्य, स्वच्छता राखणे गरजेचे : अनिल भंडारीआपल्या वाडीचे हे रोल मॉडेल संपूर्ण तालुक्यात पोहोचावे. याठिकाणी एक निसर्ग पर्यटनस्थळ सुरू होऊन वाडीच्या विकासाला चालना मिळेल. वाडीतील हा गणेशघाट आणि जलतरण तलाव तसेच आजी-आजोबा उद्यान वाडीतील आणि काळसे गावातील आबालवृद्धांसाठी कायम खुले राहील. परंतु या ठिकाणचा वापर करताना येथील पावित्र्य आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या वाडीला तहसीलदार शरद गोसावी यांच्या माध्यमातून भेट देऊन या उपक्रमांची पाहणी केली आणि कौतुक केले.